Ramayana: रणबीर कपूर साई पल्लवीच्या 'रामायण' बजेट वाचून बसेल धक्का, या कलाकरांची मांदीयाळी

Last Updated:

Ramayana Budget and starcast: भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या चर्चा आहे ती केवळ एका चित्रपटाची, तो म्हणजे नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'. भारतीय संस्कृतीचा हा अलौकिक वारसा आता एका अशा भव्य अवतारात मोठ्या पडद्यावर येत आहे.

रणबीर कपूर साई पल्लवीच्या 'रामायण' बजेट वाचून बसेल धक्का
रणबीर कपूर साई पल्लवीच्या 'रामायण' बजेट वाचून बसेल धक्का
मुंबई :  भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या चर्चा आहे ती केवळ एका चित्रपटाची, तो म्हणजे नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'. भारतीय संस्कृतीचा हा अलौकिक वारसा आता एका अशा भव्य अवतारात मोठ्या पडद्यावर येत आहे. आज 3 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता प्रदर्शित झालेल्या या बहुप्रतिक्षित सिनेमाच्या पहिल्या झलकने प्रेक्षकांची मने जिंकली असून, ही केवळ सुरुवात आहे. पहिल्या झलकनेच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
रामायण बजेट
'रामायण' सिनेमा केवळ कथेच्याच बाबतीत भव्य नाही, तर त्याच्या निर्मिती खर्चानेही सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. प्राइम फोकस स्टुडिओचे संस्थापक आणि जागतिक सीईओ नमित मल्होत्रा यांनी जेव्हा या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण केले, तेव्हाच त्याच्या भव्यतेची कल्पना आली होती. 600 कोटींच्या 'कल्कि 2898 एडी' किंवा 550 कोटींच्या 'आरआरआर' आणि 'आदिपुरुष' सारख्या चित्रपटांनाही 'रामायण'ने बजेटमध्ये मागे टाकले आहे. सूत्रांनुसार, या चित्रपटाचे बजेट सुमारे 835 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ऑस्कर विजेत्या VFX स्टुडिओ DNEG च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, हा चित्रपट एक नेत्रदीपक दृश्य नाटक (Visual Spectacle) म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
advertisement
रामायण कास्ट
या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची तगडी स्टारकास्ट, ज्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार पौराणिक भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
रणबीर कपूर - भगवान रामाच्या भूमिकेत, शांत आणि तेजस्वी रूपात.
साई पल्लवी - सीता मातेच्या भूमिकेत, तिच्या सात्विक सौंदर्याने आणि अभिनयाने लक्ष वेधून घेणार.
advertisement
यश - रावणाच्या भूमिकेत, त्याचा रौद्र अवतार आणि प्रभावी संवाद प्रेक्षकांना खिळवून ठेवणार.
रवी दुबे - लक्ष्मणाच्या भूमिकेत, त्याचा प्रामाणिक आणि समर्पित स्वभाव साकारणार.
सनी देओल - हनुमानाच्या भूमिकेत, त्याच्या दमदार आवाजाने आणि उपस्थितीने हनुमानभक्तांची मने जिंकणार.
याशिवाय, मंदोदरीच्या भूमिकेत काजल अग्रवाल आणि कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ता यांसारख्या दिग्गज अभिनेत्रीही दिसणार आहेत, ज्या कथेला अधिक वजन देतील.
advertisement
दरम्यान, 'रामायण' हा चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित न होता, दोन भव्य भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवाळी 2026 आणि दिवाळी 2027 दरम्यान या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रदर्शित होतील. नितेश तिवारी यांचा उद्देश मूळ कथेचा आत्मा समकालीन सिनेमॅटिक भाषेसोबत मिसळून, नव्या पिढीला आणि जगभरातील प्रेक्षकांना रामायणाच्या अलौकिक गाथेची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून देणे हा आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ramayana: रणबीर कपूर साई पल्लवीच्या 'रामायण' बजेट वाचून बसेल धक्का, या कलाकरांची मांदीयाळी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement