रितेश भाऊंचा 'लय भारी' परफॉर्मन्स!
यंदाच्या सीझनचे होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख पुन्हा एकदा 'भाऊचा धक्का' देण्यासाठी सज्ज झाले आहेत. ग्रँड प्रीमियरच्या सुरुवातीलाच रितेशने आपल्या धमाकेदार डान्सने मंचावर अक्षरशः आग लावली आहे. केवळ डान्सच नाही, तर रितेशचा तो खास 'स्वॅग', स्पर्धकांची फिरकी घेण्याची शैली आणि कडक शिस्त याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. रितेश यंदा कोणत्या नवीन रूपात दिसणार, हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
advertisement
बिग बॉसने रितेश भाऊंच्या हातून उघडली दोन दारं
पहिलं दार आहे शॉर्ट-कटचं दार. हे दार घरातील कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठीचं शॉर्टकट असणार आहे. या दारातून आत जाणाऱ्या सदस्याला सर्व गोष्टी जलद मिळतील. वेगवेगळ्या पॉवर्स आणि सुविधा मिळणार आहेत. तर या उलट दुसरं दार मेहनतीचं दार असणार आहे. या दारातून घराच्या आत जाणाऱ्या सदस्याला सर्व गोष्टी मेहनत करून मिळवाव्या लागणार आहेत.
कोण आहेत ते 'गूढ' स्पर्धक?
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या अधिकृत पेजवरून काही 'प्रोमोज' शेअर केले जात आहेत. यात कोणाचे चेहरे दिसले नसले, तरी त्यांच्या हालचालींवरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
नवं घर, नवा खेळ, नवा काळ!
यंदाचं घर हे केवळ राहण्यासाठी नाही, तर स्पर्धकांचे काटे काढण्यासाठी डिझाईन केलं गेलं आहे. बंक बेडची संकल्पना, ९०० दारांचा भूलभुलैया आणि ८०० खिडक्यांमधून ठेवला जाणारा खडा पहारा... हे सगळं यंदाच्या सीझनला अधिक रोमांचक बनवणार आहे. पहिल्याच दिवशी 'बिग बॉस' असा कोणता बॉम्ब टाकतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
