रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स मध्ये दीपिका पदुकोणची एंट्री झाली आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटात दीपिका शक्ती शेट्टी ही भूमिका साकारणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या अभिनेत्रीचा लूक समोर आला आहे. फोटो शेअर करून रोहित शेट्टीने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचं सांगितलं आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये दीपिकाचा गुंडांना मारताना खतरनाक लूक पाहायला मिळत आहे. हातात बंदूक, डोक्यावर जखम असलेली दीपिका गुंडाना मारताना देखील हसताना दिसत आहे.
advertisement
KKK 13 Winner : कोण आहे खतरों के खिलाडी 13 चा विजेता डिनो जेम्स? आलिशान कारसहित मिळालीय इतकी रक्कम
या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका पहिल्यांदाच पोलिसवुमनची भूमिका साकारणार आहे. तर रोहित शेट्टीही पहिल्यांदाच एका अभिनेत्रीला पोलिसवुमनच्या भूमिकेत आपल्या चित्रपटात घेऊन येत आहे. दीपिकाचा हा लूक शेअर करत रोहित शेट्टीने म्हटलं आहे की, 'स्त्री सीतेचे रूप आहे आणि दुर्गेचेही. आमच्या पोलीस विश्वातील सगळ्यात खतरनाक अधिकाऱ्याला भेटा... शक्ती शेट्टी. माय लेडी सिंघम... दीपिका पदुकोण' असं म्हटलं आहे. दीपिकाचा हा लूक तुफान व्हायरल होत आहे. 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण कलाकारांसोबत आपली जादू दाखवेल अशी अपेक्षा आहे.
'सिंघम ३'चे शूटिंग सुरू झाले आहे. सध्या त्याचा सेट मुंबईतच तयार करण्यात आला आहे. त्यात रणवीर सिंग, अक्षय कुमार, अजय देवगण यांच्याशिवाय आता दीपिका पदुकोणही सामील झाली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल आणि कदाचित 'पुष्पा 2' सोबत टक्कर होईल.
काही रिपोर्टनुसार, रोहित शेट्टी फिल्म्स दिग्दर्शित सिंघम अगेन हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट असणार आहे, ज्यामध्ये अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, करीना कपूर खान, अक्षय कुमार आणि विकी कौशल असणार असल्याचं बोलले जात आहे. 2011 मध्ये रिलीज झालेला सिंघमचा हा तिसरा भाग आहे.
दीपिका पदुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीकडे सध्या अनेक मोठे चित्रपट आहेत. ज्यामध्ये प्रभास स्टारर कल्की 2898 एडी, फायटर विथ हृतिक रोशन आणि सिंघम अगेन यांचा समावेश आहे.
