KKK 13 Winner : कोण आहे खतरों के खिलाडी 13 चा विजेता डिनो जेम्स? आलिशान कारसहित मिळालीय इतकी रक्कम
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी 13 व्या सीझनचा विजेता डिनो जेम्स कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
मुंबई, 15 ऑक्टोबर : 'खतरों के खिलाडी 13' च्या या सीझनचं विजेतेपद घोषित झालं आहे. डिनो जेम्सने या सीझनचं विजेतेपद पटकावलं आहे. डिनोने ग्रँड फिनालेचा शेवटचा स्टंट जिंकत ट्रॉफी आपल्या नावे केली. रोहित शेट्टीचा शो ‘खतरों के खिलाडी’ चा यंदा 13 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नेहमीप्रमाणेच स्पर्धकांच्या चित्तथरारक स्टंट्सने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. यंदा या सीझनमध्ये एकूण 14 स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम फेरीत ऐश्वर्या शर्मा, दिनो जेम्स, अरिजित तनेजा, रश्मीत कौर आणि शिव ठाकरे यांच्यात ट्रॉफीसाठी चुरशीची लढत होती. पण या सगळ्या स्पर्धकांना मागे टाकत डिनोने या सिझनचं विजेतेपद जिंकलं आहे.
'खतरों के खिलाडी 13' चा विजेता झाल्यानंतर डिनोला बक्षीस म्हणून 20 लाखांचा चेक देण्यात आला आहे. याशिवाय त्याला मारुती स्विफ्ट ही आलिशान कारही देण्यात आली. ट्रॉफी मिळाल्यानंतर डिनो खूप आनंदी दिसत होता. त्याच्यासह अरिजित तनेजा आणि ऐश्वर्या शर्मा टॉप 3 मध्ये होते. पण रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी 13 व्या सीझनचा विजेता डिनो जेम्स कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
advertisement
डिनो जेम्स कोण आहे?
खतरों के खिलाडी सीझन 13 चा विजेता डिनो जेम्स हा एक प्रसिद्ध रॅपर आहे. डिनो त्याच्या 'लूझर' या गाण्याने खूप लोकप्रिय झाला. मीडिया रिपोर्टनुसार, डिनो जेम्सचे लूझर हे गाणे त्याच्या आयुष्यावर आधारित आहे. रॅपर म्हणून लोकप्रियता मिळवण्याआधी डिनोने अभिनयात हात आजमावला होता, असे म्हटले जाते. डिनोने अनेक टीव्ही शोमध्येही काम केले पण डिनोला केवळ गायनामुळेच लोकप्रियता मिळाली. 2016 सालानंतर रॅपर डिनोच्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली. डिनो ने अनस्टॉपेबल, हँकॉक, माँ, यादेंसह अनेक गाणी गायली आहेत. डिनो जेम्स टीव्ही शो एमटीव्ही हसल 2.0 या रिअॅलिटी शोमध्ये स्क्वाड बॉस म्हणून दिसला होता.
advertisement
advertisement
खतरों के खिलाडी सीझन 13 मध्ये अनेक लोकप्रिय खेळाडूंनी भाग घेतला. त्यापैकी पहिली फायनलिस्ट अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा होती. पण डिनो जेम्स (डीनो जेम्स KKK 13 विजेता) ने ऐश्वर्या शर्माचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. या सीझनमध्ये ऐश्वर्या शर्मा, अंजली आनंद, अंजुम फकीह, अर्चना गौतम, अरिजित तनेजा, डेझी शाह, डिनो जेम्स, नायरा बॅनर्जी, रश्मीत कौर, रोहित रॉय, रुही चतुर्वेदी, शीझान खान, शिव ठाकरे आणि सौंदस मौफकीर यांनी भाग घेतला होता. .
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 15, 2023 12:54 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
KKK 13 Winner : कोण आहे खतरों के खिलाडी 13 चा विजेता डिनो जेम्स? आलिशान कारसहित मिळालीय इतकी रक्कम









