Heart Attack Vs Acidity : छातीतील वेदना हार्ट अटॅक की अॅसिडीटी, कसं ओळखायचं? चुकीच्या निदानामुळे पुण्यातील तरुणाचा मृत्यू
- Published by:Priya Lad
Last Updated:
Heart Attack Vs Acidity Chest Pain : बऱ्याचदा छातीत होणाऱ्या वेदना हार्ट अटॅकच्या असल्या तरी ॲसिडिटीसमजून उपचार केले जातात. असंच पुण्यातील एका तरुणासोबत झालं आणि त्याचा जीव गेला आहे. त्यामुळे छातीतील वेदनांमधील फरक प्रत्येकाला माहिती असायला हवा.
हार्ट अटॅक</a> आला होता पण डॉक्टरांनी त्याला अ‍ॅसिडिटीचं औषध देऊन घरी पाठवलं आणि तरुणाचा दोन तासांतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे छातीत होणाऱ्या वेदना हार्ट अटॅक की अ‍ॅसिडिटीच्या यातील फरक वेळीच ओळखाता यायला हवा." width="1600" height="900" /> पुण्यात एका 30 वर्षीय तरुणाला हार्ट अटॅक आला होता पण डॉक्टरांनी त्याला अ‍ॅसिडिटीचं औषध देऊन घरी पाठवलं आणि तरुणाचा दोन तासांतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे छातीत होणाऱ्या वेदना हार्ट अटॅक की अ‍ॅसिडिटीच्या यातील फरक वेळीच ओळखाता यायला हवा.
advertisement
advertisement
हल्ली हृदयरोगाचं किंवा हृदयाशी संबंधित समस्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. शिवाय कामाच्या तणावामुळे हृदयावरही बराच ताण येतो. बाहेरच्या खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हल्ली अ‍ॅसिडिटीचा त्रास होण्याचं प्रमाणही वाढलंय. अशा परिस्थिती एखाद्या व्यक्तीच्या छातीत वेदना होत असतील, तर त्या वेदना अ‍ॅसिडिटीच्या आहेत की हार्ट अटॅकच्या हे समजत नाही. हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरांनी यातील फरक समजावून सांगितला आहे.
advertisement
advertisement
हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये छातीच्या मध्यभागी तीव्र दाब, जडपणा किंवा छाती चिरडल्यासारखी वेदना होते. थोडक्यात छातीवर खूप प्रेशर आल्यासारखे वाटते. ही वेदना हात, मान, खांदा किंवा जबड्याकडे पसरू शकते. चालताना किंवा जिने चढताना वाढणारी वेदना ही हृदयविकाराचा त्रास असू शकते. कधीकधी घाम येणं, उलटी होणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे, ही पण हार्ट अटॅकची मुख्य लक्षणे असू शकतात.
advertisement
कार्डिओलॉजिस्ट डॉ. रजनीश कुमार पटेल यांनी सांगितलं, खूप छोट्या जागी वेदना, वेदना वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत, 15-20 सेकंदात संपणाऱ्या अशा खूपच कमी वेळ वेदना, चालण्याफिरण्याने आणि भारी काम केल्याने वेदना होतात, आराम केल्यानंतरही त्यात फरक पडत नाही त्या तशाच राहतात. मान, खांद्यात वेदना आणि त्यासोबत सुन्नपणा, मुंग्या आल्यासारखं वाटणं. हे सर्व्हाइक स्पॉँडियालटिसचं लक्षण असू शकतं. तिखट खाल्ल्यानंतर छातीत जळजळ, वेदना, उलटी, आंबट ढेकर, पोट फुगलेलं हे गॅस किंवा अॅसिडीटीचं लक्षण आहे.
advertisement
छातीच्या मोठ्या भागात वेदना ज्या खांदा, मान, जबड्याकडे गेल्या आहेत. चालण्याफिरण्याने, भारी किंवा मोठं काम केल्याने वेदना होतात, वाढतात आणि आराम केल्यानंतर कमी होतात. यासोबत भीती, थंड घाम, श्वास फुलणं, कमजोरी, चक्कर येणं, हृदयाचे ठोके वाढणं. छातीत जळजळ, छाती भारी भरल्यासारखी वाटणं, छातीवर दाब आल्यासारखं वाढणं मग या वेदना हार्ट अटॅकच्या वेदना आहेत.
advertisement
सिनीअर कार्डिओलॉजिस्ट डॉ. के. नरसा राजू यांनी सांगितलं की, हार्ट अटॅकच्या वेदना 10 ते 15 मिनिटं असतात. तासभरही होऊ शकतात. एका तासापेक्षा जास्त वेळ छातीत वेदना होत असतील तर जास्त गंभीर आहे. हे हृदयाच्या आजाराचं लक्षण आहे. पण 5 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी एक मिनिट, काही सेकंदच छातीत वेदना होत असतील तर त्या हृदयाशी संबंधित नाहीत.
advertisement
सगळ्यात महत्त्वाचा सिग्नल म्हणजे ॲसिडिटीची वेदना बहुतेक वेळा पाणी प्यायल्यानंतर, ॲन्टासिड गोळी घेतल्यानंतर किंवा ढेकर पास झाल्यानंतर लगेच नाहीशी होते. पण ॲन्टासिड घेतल्यानंतर हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये आराम मिळत नाही. ॲसिडिटीमध्ये जळजळ होते, तर हार्ट अटॅकमध्ये दाब, दडपण आणि घुसमट होते. हा खूप महत्त्वाचा फरक आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)









