TRENDING:

'साईबाबा' फेम अभिनेत्याची प्रकृती गंभीर, उपचारांसाठी नाहीत पैसे; मदतीला धावली बी टाऊनची स्टारकिड

Last Updated:

Sudhir Dalvi Health Update : साईबाबा या सिनेमात साईबाबांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी बॉलिवूडची स्टारकिड धावून आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
'साई बाबा' या प्रसिद्ध सिनेमात साईबाबांची प्रमुख भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडली. ते 86 वर्षांचे असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून 8 ऑक्टोबर पासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सेप्सिस (Sepsis) नावाचा गंभीर आजार झाला असून उपचारांसाठी त्यांनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
News18
News18
advertisement

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुधीर दळवी यांच्या उपचारांचा खर्च 10 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. उपचारांचा पुढील खर्च 15 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. त्यांच्या कुटुंबीयांना इतका मोठा खर्च शक्य नाहीये. त्यांची आर्थिक परिस्थिती सध्या योग्य नसल्याने त्यांनी मदतीचं आवाहन केलं आहे.

( 'गाडी सुरू असताना शर्टात हात घातला अन्...', 19 व्या वर्षी अभिनेत्रीसोबत चालत्या कारमध्ये घडला भयंकर प्रकार )

advertisement

रिद्धिमा कपूरने दिला मदतीचा हात

सुधीर दळवी यांच्या आजारपणाची बातमी सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाली. त्यानंतर त्यांच्या मदतीसाठी कपूर घराण्याची लेक पोहोचली आहे. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर हिने सुधीर दळवी यांच्यासाठी आर्थिक मदत देऊ केल्याची माहिती समोर आली आहे. तिने त्यांच्या मेडिकल फंडमध्ये पैसे डोनेट केले. त्यानंतर त्यावर "डन. तुम्ही लवकर बरे व्हा", अशी पोस्ट शेअर केली.

advertisement

ट्रोलर्ससमोर रिद्धिमाचा उत्तर 

रिद्धिमाने मदत केल्यानंतर काही सोशल मीडिया तिला ट्रोल करण्यात आलं आहे.  एका यूजरनं लिहिलंय, "जर तुम्ही मदत केली असेल तर ती पोस्ट करण्याची गरज काय होती? फुटेज घ्यायचं होतं का?" त्यावर रिद्धिमाने उत्तर दिलं, "आयुष्यात प्रत्येक गोष्ट दाखवणं गरजेचं नसतं. गरजू व्यक्तीला शक्य तितक्या क्षमतेने मदत करणं हाच सर्वात मोठा आशीर्वाद आहे."

advertisement

सुधीर दळवींचा अभिनय प्रवास

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

सुधीर दळवी यांनी अनेक वर्ष मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. 1977 साली आलेल्या 'शिर्डी के साई बाबा' या सिनेमात त्यांनी साकारलेली साई बाबांची भूमिका अजरामर झाली. या भूमिकेमुळे ते एका रात्रीत लोकप्रिय झाले. त्यांनी रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत ऋषी वसिष्ठ यांची भूमिका साकारली होती. तसेच ते 'जुनून' आणि 'चांदनी' सारख्या चित्रपटांमध्येही झळकले आहेत. ते शेवटचे 2006 मध्ये 'वो हुए ना हमारे' या मालिकेत दिसले होते. 2003 मध्ये ते 'एक्सक्यूज मी' या सिनेमात झळकले होते.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'साईबाबा' फेम अभिनेत्याची प्रकृती गंभीर, उपचारांसाठी नाहीत पैसे; मदतीला धावली बी टाऊनची स्टारकिड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल