साई पल्लवीने लावणी केलेली 'अप्सरा अली' हे 'नटरंग' या बहुचर्चित चित्रपटातील सुपरहिट गाणं आहे. या गाण्यात मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 'अप्सरा' ही भूमिका साकारली होती. गुरू ठाकूर यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते तर अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. बेला शेंडेने हे गाणं गायलं होतं. रवी जाधव यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. 'अप्सरा आली' या गाण्यानंतर सोनाली कुलकर्णीला 'अप्सरा' म्हणून ओळख मिळाली होती. अशा या लोकप्रिय गाण्यावर साई पल्लवी थिरकल्याने चाहत्यांना वेड लागलं होतं.
advertisement
सुष्मिता सेनसोबत इंटिमेट सीन अन् अभिनेत्याचा सुटला कंट्रोल, नको तिथे केलं टच; अभिनेत्री म्हणाली, 'त्याने मला...'
साई पल्लवीच्या 'रामायण'ची प्रतीक्षा
साई पल्लवी 'रामायण' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात साई पल्लवी सीतामातेची भूमिका साकारणार आहे. तर रणबीर कपूर श्रीमाच्या भूमिकेत आहे. दोन भागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जातं. 'रामायण'चा पहिला भाग 2006 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
साधेपणा हीच साई पल्लवीची ओळख
साई पल्लवीचा जन्म 9 मे 1992 मध्ये तामिळनाडूमध्ये झाला. एमबीबीएस साई पल्लवीने 2015 मध्ये 'प्रेमम' या मल्याळम चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तामिळ, तेलुगु, मल्याळम चित्रपटांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री आणि डान्स असलेल्या साई पल्लवीची खरी ओळख ही तिच्यातील साधेपणा ही आहे. तिच्या साधेपणाचं चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होतं. काली, मिडल क्लास अब्बाय, मारी 2, पावा कढाईगल, लव्ह स्टोरी, श्याम सिंघा रॉय, गार्गी, अमरन, थंडेल अशा अनेक चित्रपटांमध्ये साई पल्लवी झळकली आहे. सशक्त महिलांच्या भूमिकांसाठी साई पल्लवी विशेष ओळखली जाते. अभिनेत्रीला आजवर दोनवेळा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाले आहेत.