बॉक्स ऑफिसवर कमावले तब्बल 570 कोटी
हा सिनेमा इमोशन्सने भरलेला असला तरी त्याचं कलेक्शन मात्र जबरदस्त होतं. भारतासोबत परदेशातही सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन तब्बल 570 कोटींवर पोहोचलं. त्यामुळे हा सिनेमा 2024-25 मधील सुपरहिट सिनेमांमध्ये सामील झाला.
( 'सैयारा' म्हणजे नक्की काय? सिनेमाच्या नावामागचा नेमका अर्थ काय आहे? )
advertisement
स्टारकास्ट आणि स्टोरीने जिंकली मनं
या सिनेमातील कलाकारांचा अभिनय, जबरदस्त संगीत, आणि हृदयाला भिडणारी स्टोरी यामुळे प्रेक्षक भारावले. प्रत्येक पात्राची मांडणी इतकी उत्तम होती की प्रेक्षकांना पडद्यावरील पात्रं आपलीच वाटू लागली. अनेक वर्षांनी थिएटरमध्ये तरुणांनी इतका इमोशनल राडा घातल्याचं पाहायला मिळालं. सिनेमाचा क्लायमॅक्स पाहून तर अनेक लोक ढसाढसा रडले. कोणी सलाईन लावून थिएटरमध्ये गेलं होतं. सिनेमाची गाणी लागल्यावर अनेक आशिक दिवाने शर्ट फाडून रडू लागले.
OTTवरही प्रेक्षकांची मेजवानी
थिएटरमध्ये या सिनेमाला जेवढं प्रेम मिळालं, तेवढंच OTTवर मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण अनेक प्रेक्षक जे थिएटरमध्ये सिनेमा पाहू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. आपण बोलत आहोत तो सिनेमा सैयारा.
कधी आणि कुठे रिलीज झाला OTTवर?
थिएटरमध्ये विक्रमी कमाई करणारा सैयारा हा सिनेमा 12 सप्टेंबरला OTTवर रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सवर हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. मोहित सुरी दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता आहान पांडे आणि अभिनेत्री अनित पड्ड प्रमुख भूमिकेत आहेत. एक रोमँटिक आणि इमोशनल ड्रामा असलेली ही लव्ह स्टोरी आहे. या विकेंडला ओटीटीवर हा सिनेमा तुमचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाला आहे.