TRENDING:

Salman Khan : 15 वर्षीय गायकाने सलमानला केलंय इम्प्रेस; कोण आहे 'हा' लकी सिंगर?

Last Updated:

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये एका 15 वर्षीय गायकाचं कौतुक केलं आहे. छोट्या गायकाच्या आवाजाने आणि गाण्याने सलमानला जिंकून घेतलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

Salman Khan : बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खानने इंडस्ट्रीत अनेकांचं करिअर बनवलं आहे. चांगल्या टॅलेंटला योग्य मार्ग दाखविण्यात सलमान कधीही मागे राहत नाही. भाईजानला आता एका 15 वर्षीय गायकाने मोहिनी घातली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानने या छोट्या गायकाचं भरभरून कौतुक केलं आहे. त्यामुळे हा छोटा गायक नक्की कोण आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

advertisement

सलमानने आपल्या ट्विटरवर 15 वर्षीय गायकाचा एक फोटो शेअर केला आहे. जोनस कोनर असं या छोट्या गायकाचं नाव आहे. रॉ संगीत लेखन आणि गायकीसाठी हा चिमुकला ओळखला जातो. सलमानने जोनस कोनरचा एक फोटो शेअर करत त्याच्या संगीत, गायणाचं कौतुक केलं आहे. सलमान सध्या रिपीट मोडवर पुन्हा-पुन्हा ही गाणी ऐकत आहे.

advertisement

Dashavatar : 'दशावतार'च्या खेळापुढे 'आरपार' अन् 'बिन लग्नाची गोष्ट' पडली फिकी; तिकीटबारीवर कोणाचं कलेक्शन किती?

सलमानने केलं कौतुक!

सलमान खानने कौतुक करत लिहिलं आहे,"आतापर्यंत मी कोणत्याही 15 वर्षीय मुलाला इतकं छानपद्धतीने सादरीकरण करताना पाहिलेलं नाही. देव तुझं भलं करो. 'फादर इन अ बायबल','पीस विद पेन','ओह अपैलाचिया' ही तुझी गाणी मी पुन्हा-पुन्हा रिपीट मोडवर ऐकत आहे". सलमानने गायकासाठी एक नोटदेखील लिहिली आहे,"अशा मुलांना पाठिंबा दिला नाही तर मग काय केलं?. लहान मुलांचं शोषण न करता त्यांना प्रोत्साहन द्या". 15 वर्षीय मुलासाठी सलमानने केलेली पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी सलमान खान खऱ्या अर्थाने हीरो आहे. या गायकासह सलमानच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

advertisement

कोण आहे जोनस कोनर?

मीडिया रिपोर्टनुसार, जोनस कोनर हा अमेरिकन टीनएजर गीतकार आणि गायक आहे. आपल्या हटके गीतलेखनासाठी तो ओळखला जातो. जोनस कोनरची फादर इन अ बाइबल, पीस विद पेन, ओह अपैलाचिया ही तीन गाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. आपल्या सादरीकरणादरम्यान तो कमीत-कमी गोष्टींचा वापर करतो. त्यामुळेच तो प्रेक्षकांची मने जिंकतो. जोनसच्या गाण्यात त्याचं वैयक्तिक आयुष्य, संघर्ष आणि अडचणी अशा अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात येते.

सलमान खान सध्या 'बिग बॉस 19'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बॅटल ऑफ गलवान' हा त्याचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी त्याचा सिकंदर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. 'बॅटल ऑफ गलवान'कडून प्रेक्षकांच्या आता अपेक्षा आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Salman Khan : 15 वर्षीय गायकाने सलमानला केलंय इम्प्रेस; कोण आहे 'हा' लकी सिंगर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल