सलमान खान मंगळवारी एका इव्हेंटसाठी पोहोचला. सलमान खानला पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती.सलमान खान दादोजी कोंडदेव स्टेडियमवर प्रेसिंडेट कप 2026 साठी गेला होता. याच इव्हेंटमधून बाहेर पडताना सलमान खानच्या नाकी नऊ आले.
( 1 एप्रिलला रिलीज केली फिल्म, झाली हिट! पण नंतर फिल्मच्या दोन्ही अभिनेत्री 'गायब', नेमकं काय घडलं? )
advertisement
या इव्हेंटमध्ये सलमान खानला चारही बाजूने घेरण्यात आलं. चाहते त्याच्याबरोबर फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी गर्दी करत होते. सलमान खान या सगळ्या गोंगाटात खूप शांत होता. पण Y प्लस सिक्युरिटी असूनही इतकी गर्दी होणं सलमान खान त्यात अडकणं यामुळे त्याच्या सिक्युरिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. याच इव्हेंटमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीची प्रमुख उपस्थिती होती.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय, सलमानला चारही बाजूने लोकांनी घेरलं आहे. त्याची सिक्युरिटी त्याच्याभोवत आहे पण जमावाला आवरणं त्यांनाही कठीण जात आहे. जमलेल्या गर्दीला बाजूला सारून सिक्युरिटींनी सलमान खानना कसं तरी गर्दीतून बाहेर काढलं. इव्हेंटपासून कारपर्यंत जाण्याचा प्रवास सलमान खानसाठीही डोकेदुखी ठरला.
सलमान खानला गेल्या अनेक वर्षांपासून जीवे मारण्याच्या घमक्या मिळत आहेत. त्याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार देखील करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली. पण ठाण्याच्या इव्हेंटमध्ये झालेला प्रकार पाहून अनेकांनी हे खूप रिस्की असल्याचं म्हटलं आहे.
सलमान खानच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झाल्यास त्याचा बॅटल ऑफ गलवान हा सिनेमा आता मातृभूमी या नावानं रिलीज होणार आहे. 17 एप्रिलला सिनेमा रिलीज होणार होता मात्र सिनेमाची तारीख पोस्टपोन करण्यात आली आहे.
