TRENDING:

3 महिन्यांआधीच डिवोर्स, 'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री करतेय दुसरं लग्न, कोण आहे तिचा दुसरा नवरा?

Last Updated:

Shubhangi Sadavarte Marriage And Husband : संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्तेने काही महिन्यांआधी डिवोर्सची माहिती दिली होती. त्यानंतर आता ती दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. कोण आहे तिचा दुसरा नवरा?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संगीत देवबाभळी या प्रसिद्ध मराठी नाटकातील अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिचा डिवोर्स झाल्याची माहिती काही महिन्यांआधी समोर आली होती. शुभांगी आणि तिच्या नव्याने लग्नाच्या पाच वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. शुभांगीच्या डिवोर्सची बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. डिवोर्सनंतर शुभांगी दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. तिच्या केळवणाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
News18
News18
advertisement

अभिनेत्री शुभांगी सदावर्ते काही दिवसांतच लग्नबंधनात अडकणार आहे.  सुमित म्हशीलकरबरोबर ती दुसरा संसार थाटणार आहे. 'जुळली गाठ गं' असं कॅप्शन देत शुभांगीने तिच्या केळवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. शुभांगी आणि सुमिता यांच्या अत्यंत जवळच्या मित्र मैत्रिणींनी त्यांचं केळवण केलं.

शुभांगीचं पहिलं लग्न संगीतकार आनंद ओकबरोबर झालं होतं. आनंद हा संगीत देवभाबळी या नाटकाचा संगीत दिग्दर्शक आहे. कोरोना काळात आनंद आणि शुभांगी यांनी लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. दरम्यान तीन महिन्यांआधी दोघांनी आम्ही वेगळे झालो असल्याची माहिती सोशल मिडिया पोस्टमधून दिली होती.

advertisement

त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, "आम्ही काही वर्षांपूर्वीच वेगळे झालो होतो, पण आता हा निर्णय जाहीर करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आम्ही एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे. तसंच मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. शुभांगी एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि चांगली व्यक्ती आहे. भविष्यात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही दोघेही पूर्वीसारखंच एकत्र काम करू."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात कमी पाणी पिताय? वेळीच व्हा सावध, नाहीतर हे आजार नाही सोडणार साथ
सर्व पहा

शुभांदी सदावर्तेच्या दुसऱ्या नवऱ्याचं नाव समित म्हशीलकर असं आहे. तो प्रसिद्ध निर्माता आहे. 'ती प्रेमाची गोष्ट' या मालिकेची निर्मिती त्याने केली आहे. शुभांगीने दुसऱ्या लग्नाचा निर्णय कसा घेतला? दोघांची भेट कुठे झाली? दोघांची लव्ह स्टोरी कशी फुलली हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. केळवणाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला शभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
3 महिन्यांआधीच डिवोर्स, 'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री करतेय दुसरं लग्न, कोण आहे तिचा दुसरा नवरा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल