TRENDING:

Sanjay Dutt ने मुंबईच्या रस्त्यावर चालवली Tesla Cybertruck, किंमत ऐकून झोप उडेल, मुन्नाभाईचा VIDEO व्हायरल

Last Updated:

Sanjay Dutt : संजय दत्तने मुंबईच्या रस्त्यावर Tesla Cybertruck चालवली आहे. मुन्नाभाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते Tesla Cybertruck चालवताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भारतात Tesla Cybertruck अद्याप अधिकृतपणे लॉन्च झालेली नाही. त्यामुळे ही नवी कोरी गाडी भारतात पाहणं अनेकांसाठी दुर्मिळ दृश्य होतं. संजय दत्त आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. तसेच लक्झरी कार्सचेदेखील ते शौकीन आहेत. टेस्ला सायबरट्रकचारफ अँड टफलुक त्यांच्या ‘बाबा’ स्टाइलला अगदी साजेसा वाटतो. टेस्लाने अद्याप भारतात अधिकृत पाऊल न टाकल्यामुळे देशात सायबरट्रक दिसणे ही अत्यंत खास बाब मानली जाते.

advertisement

संजय दत्त जी गाडी चालवत होते, ती कदाचित प्रायव्हेट इम्पोर्टद्वारे भारतात आणली गेली असावी. टेस्ला सायबरट्रकची आंतरराष्ट्रीय किंमत सुमारे 80 हजार डॉलर सांगितली जाते, जी भारतीय चलनात सुमारे 72 लाख 30 हजार रुपयांच्या आसपास आहे. मात्र भारतीय रस्त्यांवर ही गाडी उतरवायची झाल्यास तिची किंमत 2 ते 3 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटी दुबईहून अशा महागड्या गाड्या इम्पोर्ट करतात. भारतात दिसलेली ही दुसरी किंवा तिसरी सायबरट्रक असल्याचे सांगितले जाते.

advertisement

टेस्ला सायबरट्रक ही केवळ एक गाडी नसून अभियांत्रिकीचा एक अद्वितीय नमुना आहे. टेस्लाची एक्सोस्केलेटन बॉडी स्टेनलेस स्टीलची बनलेली असून ती बुलेटप्रूफ आणि डेंट-फ्री असल्याचा दावा केला जातो. सायबरट्रकचाबीस्ट मोड’ तिला सुपरकारसारखी वेगवान बनवतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही गाडी अवघ्या 2.6 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. मात्र, तिचा प्रचंड मोठा आकार भारतातील अरुंद रस्ते आणि गर्दीच्या ट्रॅफिकमध्ये मोठे आव्हान ठरू शकतो.

advertisement

मुन्नाभाई’ बनून घराघरात लोकप्रिय

संजय दत्त यांचे आयुष्य आणि करिअर एखाद्या रोलर-कोस्टर राईडसारखे राहिले आहे. ‘वास्तव’मधील रघु आणि ‘खलनायक’मधील बल्लू ही पात्रे प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘अँग्री यंग मॅन’ची व्याख्या नव्याने मांडली. कॉमेडीमध्येही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘मुन्नाभाईफ्रँचायझीमुळे ते सर्वसामान्य प्रेक्षकांचे लाडके बनले. त्यांच्या जीवनावर आधारित ‘संजू’ या बायोपिकमधून लोकांना त्यांच्या आयुष्यातील त्या अंधाऱ्या पैलूंची ओळख झाली, जे आधी फक्त बातम्यांमधूनच माहित होते.

रॉकी’पासून कारकिर्दीची सुरुवात

1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणामुळे संजय दत्त यांच्या करिअरची अनेक वर्षे वाया गेली. मात्र 2016 मध्ये शिक्षा पूर्ण करून बाहेर आल्यानंतर त्यांनी केलेली दमदार पुनरागमन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. ते अशा मोजक्या बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी साऊथ सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दुसरी इनिंग यशस्वीरीत्या सुरू केली. ‘केजीएफ 2’मधील ‘अधीरा’ या भूमिकेमुळे त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. ‘लिओ’ चित्रपटात थलपती विजयसोबतची त्यांची टक्कर तमिळ सिनेमातही त्यांना भक्कम स्थान देणारी ठरली. संजय दत्त यांनी 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जेवणाची वाढेल गोडी, पारंपरिक कारळ्याची बनवा चटणी, सोप्या रेसिपीचा Video
सर्व पहा

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sanjay Dutt ने मुंबईच्या रस्त्यावर चालवली Tesla Cybertruck, किंमत ऐकून झोप उडेल, मुन्नाभाईचा VIDEO व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल