संतोष जुवेकर शेवटचा 'छावा' सिनेमात दिसला होता. अभिनेता विकी कौशलबरोबर त्याने स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर त्याचा नवा मराठी सिनेमा रिलीज झाला आहे. 'स्मॉर्ट सूनबाई' असं सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात संतोष महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्तानं संतोषनं त्याच्या लग्नाविषयी चर्चा केली.
advertisement
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संतोषला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तुझा प्रेमावर, लग्नावर विश्वास आहे का असं विचारल्यानंतर उत्तर देत संतोष म्हणाला, "माझा प्रेमावर खूप विश्वास आहे. मी अजून लग्न केलं नाही त्यामुळे मला ते माहिती नाही."
तुझ्या घरी सूनबाई कधी येणार आहे? असं विचारल्यानंतर संतोष म्हणाला, "माहिती नाही, मे बी कमिंग सून. मस्त मिळाली नाहीये." संतोष म्हणाला, मी प्रेमात पडलोय. शाळेपासून सुरुवात झाली आहे, प्रत्येकाची असतेच. नाही नाही कधीच प्रेमात पडलो नाही असं सांगण्यासारखं काही वाईट नाहीये. प्रेमात पडलो आहे अनेक वेळेला."
संतोषने लग्नाविषयीचं त्याचं मत व्यक्त केलं. तो म्हणाला, "लग्न करताना बऱ्याचदा ती मला समजून घेणारी हवी, ती म्हणते मला समजून घेणारा हवा. एकमेकांना ॲडजस्ट करायला हवं. मला वाटतं की जिकडे प्रेम आहे तिथे ॲडजस्टमेंट नसते. जिथे ॲडजस्टमेंट आहे तिथे प्रेम नसतं. कारण एकदा प्रेम जडलं की 'टेढा हैं पर मेरा' असं म्हटलं जातं."
"एखाद्यावर प्रेम बसलं की तो त्याच्या चांगल्या वाईट सगळ्या गुणदोषांसकट आपण त्याला ॲक्सेप्ट केलेलं असतं. जेव्हा, चल ठीक आहे, तो असा आहे मी करते ॲडजस्ट असं म्हटलं जातं... ॲडजस्ट केलं जातं तिथे प्रेम नसतं असं मला वाटतं", असंही संतोषने सांगितलं.
