"ती जागा पुर्णपणे ओळखीची वाटते"
सोशल मीडियावर साराने केदारनाथ मधील फोटो आणि व्हिडीओ शेयर केले आहेत. केदारनाथची सुंदरता आणि तेथील लोकांचे आपलेपण त्यात तिने दाखवले आहे. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने 'जय श्री केदार' असे लिहीले आहे . त्यानंतर ती म्हणाली, " जगातील अशी एक जागा जिथे मला आपलेपणा वाटतो, प्रत्येक वेळेस मला ती जागा आश्चर्यकारक आणि चकित वाटते. मी धन्यवाद देते. तुम्ही मला सर्व दिले आणि मी जी आहे तेच मला बनवले." सारा खूप वेळा केदारनाथला भगवान भोलेनाथाच्या दर्शनाला गेली आहे. त्यावेळीही तिने असे फोटो, व्हिडिओ शेयर केले होते.
advertisement
पहिल्यांदाच भाड्याच्या घरात दिवाळी साजरी करतोय किंग खान! गौरीचा फोटो शेअर करत म्हणाला...
यावेळी तिने सोशल मीडियावर शेयर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे. तर काहींनी तिला ' तु मुस्लिम असून हिंदू देवदेवतांचे दर्शन कशी घेतेस' अशा टीकाही केल्या आहेत. हे सगळं तिचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
साराचे नवे येणारे सिनेमे
'पति पत्नी और वो 2' या सिनेमातून ती आयुष्मान खुराना सोबत दिसणार आहे. हा सिनेमा 2019 मध्ये आलेला सिनेमा 'पति पत्नी और वो' या सिनेमाचा सिक्वेल आहे. यात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे सुद्धा होते. सारा याआधी 'मेट्रो… इन दिनों' या सिनेमातून दिसली होती.त्यात तिच्या अभिनयाचे भरभरुन कौतुक झाले होते.
