Shahrukh Khan : पहिल्यांदाच भाड्याच्या घरात दिवाळी साजरी करतोय किंग खान! गौरीचा फोटो शेअर करत म्हणाला...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Shah Rukh Khan Diwali celebration : शाहरुख खानने यंदा दिवाळी मन्नतऐवजी भाड्याच्या घरात साधेपणाने साजरी केली. गौरी खानने लक्ष्मी पूजा केली.
मुंबई : सर्वत्र दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननेही आपल्या कुटुंबासोबत हा सण साजरा केला आहे. शाहरुख दरवर्षी दिवाळीला दिमाखदार पार्टीचं आयोजन करतो, पण यावर्षी त्याने अगदी साध्या आणि शांत पद्धतीने सेलिब्रेशन केले. या साधेपणाची झलक शाहरुखने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली आहे.
गौरी खान पूजा करताना, शाहरुखने मागून काढला फोटो!
शाहरुख खानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक खास फोटो शेअर केला आहे, जो दिवाळी पूजेच्या वेळचा आहे. या फोटोत गौरी खान पूजा करताना दिसत आहेत. शाहरुखने हा फोटो मागून क्लिक केला आहे.
या पूजेच्या फोटोसोबत शाहरुखने एक प्रेमळ कॅप्शनही लिहिले आहे. त्याने म्हटले आहे की, "तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! माता लक्ष्मी तुम्हाला समृद्धी आणि आनंद देवो. सगळ्यांसाठी प्रेम, प्रकाश आणि शांतता लाभो, ही सदिच्छा."
advertisement
Happy Diwali to everyone! May Goddess Lakshmi ji bless you with prosperity and happiness. Wishing love, light and peace to all. pic.twitter.com/kHzH3or17a
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 20, 2025
शाहरुखच्या या पोस्टवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोकांना शाहरुखचा हा सर्वधर्मसमभावाचा खास अंदाज खूप आवडला आहे.
advertisement
'मन्नत' सोडून 'भाड्याच्या' घरात दिवाळी!
दरवर्षी शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात बॉलिवूडसाठी मोठी दिवाळी पार्टी होते. पण यावर्षी मन्नतचे रेनोव्हेशनचे काम सुरू असल्याने शाहरुख आणि त्याचे कुटुंब सध्या एका भाड्याच्या घरात शिफ्ट झाले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी पार्टी त्यांनी टाळली. म्हणूनच, त्यांनी नव्या तात्पुरत्या घरात अत्यंत साध्या पद्धतीने दिवाळी पूजा केली, मिठाई वाटली आणि दीवा लावून सण साजरा केला.
advertisement
दरम्यान, शाहरुख लवकरच आपली मुलगी सुहाना खानसोबत 'किंग' चित्रपटात दिसणार आहे. या अॅक्शन-पॅक चित्रपटात दीपिका पादुकोणही महत्त्वपूर्ण भूमिकेत असेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 3:27 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shahrukh Khan : पहिल्यांदाच भाड्याच्या घरात दिवाळी साजरी करतोय किंग खान! गौरीचा फोटो शेअर करत म्हणाला...