10 प्रयोगाचं मानधन पूरग्रस्तांना देणार : सयाजी शिंदे
"मला परत मी आयुष्यात नाटक करेन, असं वाटलं नव्हतं. पण तरी हे नाटक करायला घेतलं. हे नाटकं इतरं जिवंत, अनेक कालातीत आणि सुंदर आहे. सुंदर विचारांचं आहे. त्यामुळे हे नाटक करावं, असं मला वाटलं. दिल्लीत शुभारंभाचा हाऊसफुल्ल प्रयोग पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रभर या नाटकाचे प्रयोग होतील. महाराष्ट्रात पूरपरिस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे या शुभारंभाच्या प्रयोगाचा नफा आम्ही पूरग्रस्तांना देणार आहोत. तसेच मी माझं पुढील 10 प्रयोगांचं मानधन पूरग्रस्तांना देणार आहे. महाराष्ट्रातील लोकांना माझं आवाहन आहे की पूरपरिस्थितीतील सर्वांना चांगलं जीवन जगता यावं यासाठी पाठिंबा द्या".
advertisement
Netflix वर रिलीज होणार 75 वेब सीरिज! 18+ बोल्ड चित्रपटांचाही समावेश; कुटुंबासोबत पाहण्याचा विचारही करू नका
विजय तेंडुलकर लिखित 50 वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेल्या 'सखाराम बाईंडर' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच दिल्लीत संसदेत पार पडला. अभिजीव झुंजारराव यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर मनोहर जगताप यांनी निर्मिती केली आहे. सयाजी शिंदे, नेहा जोशी, अनुष्का वश्वास, अभिजीत झुंजारराव आणि चरण जाधव या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. सुमुख चित्रद्वारे या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत आणि वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे.
सयाजी शिंदे हे नेहमीच समाजीसाठी आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने वेगवेगळ्या माध्यमातून समाजाप्रती काहीना काही करत असतात. त्यामुळे आताही एक रुपये मानधनावर ते 'सखाराम बाइंडर' या नाटकाचे विशेष प्रयोग करत आहेत. कला आणि माणुसकीचा अनोखा संगम सध्या या नाटकाच्या प्रयोगात पाहायला मिळत आहे.