शाहरुखच्या मुंबईतील पहिल्या घरासंबंधी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शाहरुख खानचं पहिलं घर हे कार्टर रोड येथे आहे. अमृत असं त्याच्या घराचं नाव आहे. पण अमृत आता दिसेनासं होणार आहे. कारण शाहरुखच्या अमृत या घराचा पुनर्विकास होणार आहे. मुंबईतील सर्वात पॉश एरियामध्ये असलेली शाहरुख ही प्रॉपर्टी त्याच्या आयुष्यातील आणि कुटुंबातील एक महत्त्वाची खूण आहे.
advertisement
Shahrukh Khan Mannat : शाहरूखला वाढवायची आहे मन्नतची उंची! तेवढ्या पैशात वांद्र्यात येतील 20 घरं
शाहरुखच्या अमृतचा पुनर्विकास होणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार या इमारतीवर अनेक बिल्डरांची नजर आहे. या मालमत्तेत शाहरुखच्या मालकीच्या टेरेस फ्लॅटचा समावेश आहे. काही वर्षांआधी शाहरुख खान हा फ्लॅट त्याचं ऑफिस म्हणून वापरत होता. मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच 10 बांधकाम व्यावसायिकांनी या मालमत्तेचा पुनर्विकास करण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. येत्या आठवड्यात, समिती दोन विकासकांना अंतिम रूप देईल आणि पुनर्विकासासाठी कोण अधिक योग्य आहे याचे मूल्यांकन करेल.
विवेक वासवानी यांनी किंग खानच्या घराबद्दल खुलासा केला होता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीदरम्यान अभिनेता-निर्माता विवेक वासवानी म्हणाले होते, "शाहरुख खानच लग्न होईपर्यंत तो माझ्या घरी राहत होता. गौरीशी लग्न केल्यानंतर ते ताज लँड्स एंडच्या शेजारी असलेल्या देवदत्तच्या घरी राहायला गेले. ते अजीज मिर्झाच्या घरात राहायला गेले. अजीजच्या पत्नीने तिची टीआयएफआरमधील नोकरी सोडली तेव्हा त्यांना देवदत्तकडे परत जावे लागले. त्यानंतर त्या रिकामी घरात शाहरुख राहायला गेला.
शाहरुखने अमृतने फ्लॅट कसा खरेदी केला?
वासवानी यांनी सांगितले की, शाहरुख खान आणि गौरी लग्नानंतर माउंट मेरी येथील असुदा कुटीर येथे एका छोट्या फ्लॅटमध्ये राहत होते. या कठीण काळात चित्रपट निर्माते प्रेम लालवानी यांनी शाहरुखला गुड्डू चित्रपटात भूमिका ऑफर केला होता. शाहरुखने तेव्हा फ्लॅट घेण्यासाठी 40 लाख रुपये मागितले होते. त्याबदल्यात चित्रपटासाठी तारखा देण्याचं आश्वासन त्यानं दिलं होतं. लालवानी यांनी शाहरुखला पैसे आणि त्या पैशातून त्याने अमृत हा फ्लॅट विकत घेतला. ही मालमत्ता पूर्वी राजेश खन्ना यांचे मामा ए.के. ती तलवारी यांची होती.
