शाहरूख खानसाठी 'किंग' सिनेमा खास ठरणार आहे. कारण त्याच्यासोबत त्याची लेक सुहाना खान सुद्धा या चित्रपटातून रुपेरी पडद्यार डेब्यू करणार आहे. शाहरूख खान आणि सुहाना खान सोबतच चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी सारखी तगडी स्टारकास्ट देखील चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक आणि निर्माते चित्रपटाच्या ॲक्शन सीन्ससाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणार असल्याची माहिती मिळाली आहे. 'किंग' सिनेमाबाबतीत एक लेटेस्ट माहिती समोर आली आहे, जी सर्वांनाच आश्चर्य करणारी ठरली आहे. या संबंधितची माहिती एका इंग्रजी वेबसाईटने दिलेली आहे.
advertisement
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटातील एका खास ॲक्शन सीक्वेन्सच शुटिंग युरोपमधील एका खास लोकेशनवर शूट केली जाणार आहे. या सीक्वेन्सच्या शुटिंगसाठी 10 दिवसांचं शेड्युल्ड केलं जाणार आहे. फक्त 10 दिवसांच्या शुटिंगचं अॅक्शन शेड्युल्ड पूर्ण करण्यासाठी प्रोडक्शन टीमने 50 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मिळत आहे.. याचा अर्थ एका दिवसाच्या शुटिंगसाठी निर्मात्यांकडून तब्बल 5 कोटी रुपये खर्चण्यात येणार आहेत. चित्रपटाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, हा भारतीय चित्रपटसृष्टीत पाहिलेल्या सर्वात महागड्या आणि भव्य ॲक्शन सीन्सपैकी एक असणार आहे. युरोपमध्ये शाहरूख खान आणि अभिषेक बच्चन हाय ऑक्टेन स्टंटची शुटिंग पूर्ण करणार आहेत.
ॲक्शन सीक्वेन्ससाठी सेलिब्रिटींना स्टंटसाठी ट्रेन करण्यासाठी एका स्टंट टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीच हे 10 दिवसांचं शुटिंग केलं जाणार आहे. मोठ्या पडद्यासाठी काहीतरी भव्य आणि आकर्षक स्टंट सादर करण्याच्या कल्पनेने शाहरुख खूप प्रभावित झाला होता, त्यामुळे त्याने संपूर्ण सीक्वेन्सचे व्यवस्थित निरीक्षण केले. त्याने सिद्धार्थ आनंदला युरोपमध्ये ओरिजनल लोकेशन्सवर संपूर्ण सीक्वेन्सची योजना आखण्यास मदत केली आणि तो परिपूर्णपणे साकारण्यात आला. जून 2026 पर्यंत चित्रपटाची शुटिंग पूर्ण होणार असून त्यानंतर चित्रपटाच्या एडिटिंगसह इतरत्र कामाकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे. हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात महागड्या ॲक्शन चित्रपटांपैकी एक असणार आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी अंदाजे खर्च 350 कोटी रूपयांच्या आसपासचा आहे. ज्यामध्ये मार्केटिंगचा खर्च वगळण्यात आला आहे.
