आर्यन खान म्हणाला, “जेव्हा जेव्हा अडचणी आल्या, तेव्हा माझ्या मनात जराजचा आवाज घुमत होता. हरण्यात आणि हार मानण्यात खूप फरक असतो. सुरुवातीला वाटलं ही प्रेरणा आहे. पण नंतर समजलं की ही झोपेची कमतरता आणि थकवा होता. तरीसुद्धा, याने मला पुढे जाण्याची ताकद दिली. प्रेक्षकांचं प्रेम पाहून मन भरून येतं. आता ही कथा फक्त माझी राहिलेली नाही, ही प्रेक्षकांची झाली आहे, आणि नेटफ्लिक्सने ती जगापर्यंत पोहोचवली आहे.” नेटफ्लिक्स इंडियाच्या व्हाइस प्रेसिडेंट मोनिका शेरगिल यांनी सांगितले, “या सीरिजला अफाट प्रेम मिळत आहे. सीरिजमधील प्रत्येक सीन प्रेक्षक मीम्स, रील्स आणि रिव्ह्यूजद्वारे शेअर करत आहेत. आर्यनने बॉलिवूडची भावना आणि स्वप्नं खूपच छान प्रकारे दाखवली आहेत.”
advertisement
जगभरात 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा डंका!
सोशल मीडियावर या सीरिजने धुमाकूळ घातला आहे. बॉबी देओलचं 1997 मधील गाणं ‘दुनिया हसीनों का मेला’ सीरिजनंतर पुन्हा एकदा हिट झालं असून, ते 50 लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर आणि लंडनच्या किंग्स क्रॉस स्टेशनवर या सीरिजचे पोस्टर्स लावले गेले.
बॉबी देओल आणि राघव जुयाल यांनी दुबईमध्ये झालेल्या एशिया कप दरम्यान चाहत्यांची भेट घेतली. बॉबी देओल, लक्ष्य, साहेर बंबा, राघव जुयाल, मनोज पहवा, मोना सिंग, मनीष चौधरी, आन्या सिंग, विजयंत कोहली, गौतमी कपूर आणि रजत बेदी यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांनी सजलेली ही सीरिज बॉलिवूडच्या झगमगाटासोबतच त्यामागील मेहनतही दाखवते.
तगडी स्टारकास्ट असलेली Bads of Bollywood
'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरिजमध्ये सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, तमन्ना भाटिया, गौरी खान, सुहाना खान, साजिद नाडियाडवाला, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, रणबीर कपूर, करीना कपूर, आलिया भट्ट, बादशाह, दिलजीत दोसांझ, यो यो हनी सिंह, करण जोहर, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि दिशा पाटनी अशा बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्सने कॅमिओ केला आहे. त्यामुळे तगडी स्टारकास्ट असलेली ही सीरिज आहे.