लेक झाली हो! हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास घेत नाही एकही रुपया, डॉक्टर नाही देवमाणूस! Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
डॉ.गणेश राख गेल्या अनेक वर्षांपासून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी काम करत आहेत. त्याच्या हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास एकही रुपये फी आकारली जात नाही.
पुणे: पुण्यात मुलींचा जन्मदर कमी होत आहे, असं एका अलीकडील झालेल्या सर्व्हेमधून समोर आलं आहे. पण हडपसरमधील मेडिकेअर हॉस्पिटलचे डॉ. गणेश राख गेल्या अनेक वर्षांपासून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास एकही रुपया फी आकारली जात नाही. पूर्णपणे मोफत मुलीची प्रसूती केली जाते. विशेष म्हणजे, मुलीच्या जन्मानिमित्त हॉस्पिटलमध्ये फुले लावली जातात, मिठाई वाटली जाते आणि वाजत-गाजत जंगी स्वागत केले जाते.
डॉ. गणेश राख हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील आहेत. त्यांनी गेल्या 14 वर्षांत 2,500 हून अधिक बाळांची मोफत प्रसूती केली आहे आणि त्यांच्या या कार्याची दखल अनेकांनी घेतली आहे. डॉ. गणेश राख यांनी ही चळवळ सुरू केली तेव्हा त्यांना मित्र आणि कुटुंबाकडून काही प्रमाणात विरोध झाला. पण काही काळानंतर त्यांच्या निश्चय पाहून कुटुंबाने आणि मित्रमंडळींनी त्यांना पाठिंबा दिला.
advertisement
तर अशी झाली या संकल्पनेची सुरुवात
14 वर्षांपूर्वी डॉ. गणेश राख यांनी या चळवळीला सुरुवात केली. त्यांनी हॉस्पिटल सुरू केल्यानंतर त्यांना अनेक अनुभव आले. यामध्ये मुलगा जन्माला तर परिवार आनंद उत्सव साजरा करायचं. खुशीने बिल सुद्धा द्यायचे. मात्र, याउलट मुलगी झाली की मातेला आणि मुलीला भेटायला सुद्धा कुटुंबातील लोक येत नसायचे. बिल देण्यासाठी टाळाटाळ केली जायची. त्यामुळे डोक्यात एक कल्पना आली कुटुंब जर मुलीच्या जन्माचे स्वागत करत नसेल तर आपण हॉस्पिटलच्या वतीने मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत करायचं आणि एकही रुपया फी घ्यायची नाही असं ठरलं आणि ही चळवळ सुरू झाली असं डॉ. गणेश राख यांनी सांगितलं.
advertisement
मुलगी जन्माला आली की हॉस्पिटलमध्ये मोठं सेलिब्रेशन
view commentsडॉ. गणेश राख यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्यादिवशी मुलगी जन्माला येते त्याच दिवशी हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी एकत्र येत मोठं सेलिब्रेशन करतात. मुलीच्या संपूर्ण कुटुंबियांचा छोटा सत्कार केला जातो. हॉस्पिटल देखील सजवण्यात येतं. कर्मचारी आणि मुलीचं कुटुंबीय मिळून केक कापण्यात येतो.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 04, 2025 4:52 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
लेक झाली हो! हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास घेत नाही एकही रुपया, डॉक्टर नाही देवमाणूस! Video










