शाहरूख खान 'जवान' आणि 'पठाण'नंतर आता डंकीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर 'आदिपुरूष'च्या फ्लॉप नंतर प्रभासच्या 'सालार'ची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. दोन्ही सिनेमाचं अँडवान्स बुकींग पाहायला गेलं तर सालारच्या अँडवान्स बुकींगनं डंकीला मागे टाकलं आहे.
हेही वाचा - आईसाठी काय पण! भाईजाननं दिली फोटोग्राफर्सना ताकिद, 'या' कारणामुळे चांगलाच भडकला सलमान, Video
advertisement
दोन्ही सिनेमांचं अँडवान्स बुकींग हैराण करणार आहे. प्रभासचा 'सालार' प्री तिकिट बुकींगमध्ये सलमान खानला तगडी फाइट देतोय. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'डंकी'च्या फर्स्ट डेसाठी आतापर्यंत 3 लाख 67 हजार तिकिटं विकली गेली आहेत. 'डंकी'च्या अँडवान्स बुकींगची आतापर्यंतच विक्री ही 10.47 कोटी रूपये झाली आहे.
तर प्रभासचा 'सालार: पार्ट 1 सीजफायर' हा सिनेमा एकूण 6 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाची आतापर्यंत 6 लाख 78 हजार तिकिटं विकली गेली आहेत. सिनेमाच्या अँडवान्स बुकींची आतापर्यंतची विक्री 14.88 कोटी रूपये आहे. 'सालार' आणि 'डंकी' यांच्यात तगडी टक्कर पाहायला मिळतेय. शाहरूख खानवर प्रभास भारी पडणार असं दिसतंय. असं झाल्यास आदिपुरूषमुळे प्रभासच्या नावावर बसलेला फ्लॉपचा ठप्पा दूर होण्यास मदत होईल.
'सालार' सिनेमा 22 डिसेंबरला रिलीज होतोय. सिनेमा दमदार अँक्सन सीननं भरलेला आहे. तर शाहरूखचा 'डंकी' एक दिवस आधी म्हणजेच 21 डिसेंबरला रिलीज होतोय. सिनेमात शाहरूख खानसह तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन ईरानी, विक्रम कोचर, अनिल ग्रोवर आणि ज्योती सुभाष अशी तगडी स्टारकास्ट आहे.