शाहरुख खानने कॉपी केली 'F1' ची स्टाइल?
'किंग'चा पहिला लूक प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. शाहरुखचा निळ्या शर्ट आणि टॅन जॅकेटमधील हा लूक आणि ब्रॅड पिटच्या 'F1' चित्रपटातील एका सीनचा लूक हे जवळपास सारखे दिसत असल्याचा दावा अनेकांनी केला. अनेकांनी X वर या दोन लूकचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले. काही युजर्सनी याला इन्स्पिरेशन म्हटले, तर काहींनी थेट चीप कॉपी असे टोमणे मारले.
advertisement
एका युजरने लिहिले, "किंगमध्ये शाहरुख खानला F1 मधील ब्रॅड पिटसारखे दाखवले आणि त्यांना जराही संकोच वाटला नाही." दुसऱ्याने म्हटले, "कॉस्ट्यूम डिझायनरने 'किंग'च्या सेटवर जाण्यापूर्वी फक्त F1 चित्रपट पाहिला होता आणि ते लपवण्याचा प्रयत्नही केला नाही."
शाहरुखची बाजू घेत चाहत्यांनी दिले पुरावे
या टिकेमध्येच शाहरुखच्या काही चाहत्यांनी त्याला जोरदार पाठिंबा दिला. एका चाहत्याने २०१७ मध्ये आलेल्या 'जब हॅरी मेट सेजल' चित्रपटातील शाहरुखचे फोटो शेअर करत आठवण करून दिली की, हा लूक तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास सर्वात आधी शाहरुखनेच कॅरी केला होता. ट्रोल करणाऱ्यांवर पलटवार करत त्याने लिहिले, "लोक शाहरुखला ब्रॅड पिटची नक्कल केल्याबद्दल ट्रोल करत आहेत. खरंच भाई?"
शाहरुखची क्रेझ पुन्हा एकदा काम करणार का?
'किंग' या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत, ज्यांनी यापूर्वी २०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'पठाण' या सुपरहिट चित्रपटात शाहरुखसोबत काम केले होते. 'किंग' मध्ये शाहरुख खानसोबत त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पादुकोण आणि अभिषेक बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. आता, लूकची तुलना होत असली तरी, शाहरुखची क्रेझ प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिएटरमध्ये खेचून आणणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
