TRENDING:

'ज्या शाळेत मतदान केलं...' शशांक केतकरनं दाखवली ठाण्यातील इंटरनॅशनल स्कूलबाहेरची भीषण परिस्थिती

Last Updated:

Shashank Ketkar Video Thane : अभिनेता शशांक केतकर ठाण्यातील ज्या शाळेत मतदान करायला गेला होता त्या शाळेबाहेरची भीषण परिस्थिती त्याने दाखवली. शशांकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर मागचे काही दिवस मंदार देवस्थळी प्रकरणामुळे चर्चेत आहे. शशांक नेहमीच सामाजिक विषयांवर भाष्य करत असतो. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत असतो. त्याच्या या व्हिडीओ आणि पोस्टची अनेकदा दखलही घेतली जाते. दरम्यान आज मतदानाच्या दिवशी देखील शशांक केतकरनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून शशांकबरोबरच अनेकांनी संपात व्यक्त केला आहे.
News18
News18
advertisement

महापालिका निवडणुकींसाठी आज मतदान होतंय. या मतदानांसाठी प्रामुख्यानं शाळांची निवड करतात. स्थानिक शाळांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडतात. शशांक देखील अशाच एका स्थानिक शाळेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेला होता. पण तिथे गेल्यानंतर त्याला जे काही दिवस पाहून तो चांगलाच संतापला.

शशांक ठाण्यातील ज्या शाळेत मतदान करायला गेला होता त्या शाळेच्या बाहेर कचऱ्याचा ढीग पडला होता. हा कचरा पाहून शशांकनं व्हिडीओ शेअर करत पुन्हा एकदा जनतेचे डोळे उघडले आहेत. ज्या शाळेत मतदान केलंय त्या शाळेच्या बाहेरच ही अवस्था आहे असं म्हणत शशांकने व्हिडीओ शेअर केला आहे.

advertisement

शशांकने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "ज्या शाळेत मतदान केले त्या शाळेच्या exact बाहेर ही अवस्था आहे . उद्या कोणत्याही पार्टीतला कोणीही निवडून आला तरी ‘ स्वच्छता ‘ या basic गोष्टीसाठी कोणीही पुढाकार घेणार नाही आणि नागरीक सुद्धा स्वतछतेकडे लक्ष देणार नाहीत याची खात्री आहे."

"ही माझ्या मनातली उदासीनता नाहीये … वस्तुस्थिती आहे . INTERNATIONAL SCHOOL आहे ही ठाण्यातली त्या शाळेच्या दारात ही अवस्था आहे. #हे_चालणार_नाही." फक्त व्हिडीओ शेअर केला नाही तर शशांकने ठाण्यातील सगळ्या राजकीय नेत्यांना हा व्हिडीओ टॅग देखील केला आहे.

advertisement

शशांक केतकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक नागरिकांनी त्याच्या मताशी सहमती दर्शवली आहे. काहींनी ठाणे महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थंडीच्या दिवसांत बनवा कुरकुरीत केळीची भजी, चवीला अतिशय टेस्टी, रेसिपीचा Video
सर्व पहा

आज सकाळीच अनेक कलाकार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. मतदानाचा हक्क बजावून ते त्यांच्या पुढच्या कामाला देखील निघाले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'ज्या शाळेत मतदान केलं...' शशांक केतकरनं दाखवली ठाण्यातील इंटरनॅशनल स्कूलबाहेरची भीषण परिस्थिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल