TRENDING:

'ती लपूनछपून माझ्या मित्रासोबत...' सुष्मिता सेनच्या भावाचे Ex वाइफवर गंभीर आरोप, सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण

Last Updated:

Charu Asopa-Rajeev Sen : चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या नात्यात तणाव वाढला आहे. राजीवने चारूवर गंभीर आरोप केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एकेकाळी बॉलिवूडच्या ग्लॅमरस जोड्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे चारू असोपा आणि राजीव सेन सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. घटस्फोटानंतरही एकत्र मुलीसोबत वेळ घालवणाऱ्या या दोघांमधील नात्यात सध्या खूप तणाव पाहायला मिळतोय. आता या वादात आणखी एक नवा खुलासा झाला आहे. राजीव सेनने चारूवर काही गंभीर आरोप केले आहेत.
चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या नात्यात तणाव वाढला आहे.
चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या नात्यात तणाव वाढला आहे.
advertisement

चारूने नुकतीच आर्थिक अडचणींमुळे अभिनय आणि मुंबई सोडल्याची कबुली दिली होती. ती सध्या बिकानेरमध्ये तिच्या मूळ घरी राहत असून कपड्यांची ऑनलाइन विक्री करत असल्याचे व्हायरल झालेल्या फोटोंमधून समोर आले आहे. पण राजीवने यावर नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणतो, “ती फक्त लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी आणि माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हे सगळं करत आहे. तिने तिच्या आर्थिक परिस्थितीविषयी केलेले दावे चुकीचे आहेत. उलट मीच तिच्यासाठी क्लोदिंग ब्रँडसाठी वेबसाइट बनवून दिली होती.”

advertisement

अमिताभ बच्चनचा जावई, तरीही 18 वर्षांपासून करतोय स्ट्रगल, 166 कोटींच्या मालकाने दिला नाही एकही हिट

सहानुभूतीसाठी खेळते व्हिक्टिम कार्ड - राजीव

राजीवच्या म्हणण्यानुसार, चारू एक ‘इम्पल्सीव्ह ह्युमन’ आहे. म्हणजेच ती आवेगाने निर्णय घेते. “तिला काय योग्य आहे हे समजत नाही, फक्त व्हिक्टिम कार्ड खेळून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते,” असं राजीव म्हणतो.

advertisement

राजीवच्या बेस्टफ्रेंडसोबत साधली जवळीक

एका मुलाखतीमध्ये राजीवने दावा केला आहे की, दुबईच्या एका ट्रिपदरम्यान त्याने चारूला तिच्या आणि त्याच्या २० वर्षांच्या जुना मित्राशी गुप्त संवाद करताना पाहिलं. “ती माझ्या मित्राशी माझ्या नकळत बोलत होती आणि त्याला इंस्टाग्रामवर फॉलो देखील करत होती. मी जेव्हा तिला विचारलं, तेव्हा ती शांत राहिली. मला हे कळतंय की तिला पुरुष मित्र आहेत, पण माझ्या बेस्ट फ्रेंडशी अशी लपूनछपून मैत्री करणं मला खटकलं,” असं राजीव म्हणतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
खरकट्या मारुती? पुणेकरांनी असं का दिलं नाव? 100 वर्ष जुनं आहे ठिकाण!
सर्व पहा

सध्या चारू या सगळ्यावर मौन बाळगली आहे. पण राजीवच्या या आरोपांनंतर ती काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुष्मिता सेनची ही ‘एक्स वहिनी’ आणि राजीव सेन यांचं नातं सध्या चर्चेचा विषय ठरत आहे!

मराठी बातम्या/मनोरंजन/
'ती लपूनछपून माझ्या मित्रासोबत...' सुष्मिता सेनच्या भावाचे Ex वाइफवर गंभीर आरोप, सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल