Shiv Thakare : शिव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एक लग्न मंडपातील फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. पण नंतर हा शूटिंगमधील फोटो असल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे चाहते नाराज झाले. दरम्यान चाहत्यांना शिव ठाकरेच्या लग्नाची प्रतीक्षा आहे. दरम्यान शिव ठाकरेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिव ठाकरे लग्न आणि होणाऱ्या बायकोबाबत बोलताना दिसत आहे. 2026 मध्येच विवाहबंधनात अडकणार असल्याचं त्याने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. पण होणारी पत्नी कोण? याबाबत मात्र त्याने काहीही सांगितलं आहे.
advertisement
शिव ठाकरे लग्नाच्या अफवांवर काय म्हणाला?
शिव ठाकरेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे सर्वांनाच वाटू लागलं की त्याने आपल्या सीक्रेट गर्लफ्रेंडसोबत गुपचूप लग्न उरकलं आहे. नंतर त्याने एक व्हिडिओ पोस्ट करून सांगितलं की तो त्याच्या लेटेस्ट शूटचा एक क्लिप होता. अशातच आता सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पापराझी शिवला त्याच्या सिक्रेट लग्नाबद्दल शुभेच्छा देत आहेत. त्यावेळी शिव म्हणतोय,"कशासाठी".
शिव ठाकरे कधी लग्न करतोय?
शिव ठाकरे म्हणाला,"चुकून झालं भाऊ. शूटिंग होती. शूटिंगचं लग्न होतं. माझी आई तिथे नव्हती. आईशिवाय लग्न होईल का? पण आता इतकं प्रेम मिळतंय तर वाटतंय लवकरच लग्न करावं. याच वर्षी मी लग्न करतोय. देवाच्या मनात असेल तिच्यासोबतच लग्न होईल. देवाला वाटतंय की गावाकडच्या मुलीसोबत लग्न व्हावं. सूनबाईची निवड आईच करणार एवढं मात्र नक्की".
कोण आहे शिव ठाकरे?
शिव ठाकरे हे रिअॅलिटी टीव्ही विश्वातील एक ओळखीचं नाव आहे. त्याने MTV रोडीज 15, बिग बॉस 16, खतरों के खिलाडी 13 आणि झलक दिखला जा 11 या शोमध्ये सहभाग घेतला आहे. शिव ठाकरे 'बिग बॉस मराठी 2'चा विजेता ठरला होता.
