सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावात राहणाऱ्या रंगनाथ गावडे यांनी एका एकरामध्ये कांद्याची लागवड केली होती. कांदा लागवडीला लागणारे बियाणे, औषध, फवारणी, खत असा मिळून जवळपास एका एकराला 50 हजार रुपयांचा खर्च रंगनाथ यांना आला होता. कांद्यावर रोग पडू नये म्हणून पोटच्या बाळाप्रमाणे कांद्याला जपले होते. परंतु ज्या वेळेस कांदा विक्रीसाठी बाजारात रंगनाथ यांनी घेऊन गेले, तेव्हा कांद्याच्या 22 पोत्याला 5 हजार रुपयांचा दर मिळाल्याने रंगनाथ गावडे हवालदिल झाले आहेत.
advertisement
पुण्यात कढीपत्त्यावरून राडा! 5-6 जणांच्या टोळक्याचं तरुणासोबत भररस्त्यात धक्कादायक कृत्य
गावडे यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हा कांदा विक्रीसाठी घेऊन गेले असता, चांगल्या कांद्याला 1200 रुपये क्विंटल दर मिळाला. 2 नंबर कांद्याला 600 रुपये क्विंटल दर मिळाला तर 3 नंबर कांद्याला 300 रुपये क्विंटलने दर मिळाला आहे. निर्यात बंदी उठून सुद्धा कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. कांदा बाजारात घेऊन विक्री करावी की नागर फिरवावा? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबावे अशी आर्त हाक बळीराजा रंगनाथ गावडे यांनी केली आहे.





