अभिनेता श्रेयस तळपदेनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. श्रेयसनं अफवा पसरवणाऱ्यांना खडे बोल देखील सुनावले आहेत. श्रेयसनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "माझ्या निधनाचा दावा करणारी एक व्हायरल पोस्ट मी पाहिली. हे खरंच हास्यास्पद आहे. त्याचा गैरवापर करून नुकसान होऊ शकतं. एखाद्यानं विनोद म्हणून जी गोष्ट सुरू केली असेल तर त्यामुळे अनावश्यक चिंता निर्माण होऊ शकते. माझ्या आणि विशेषत: माझ्या कुटुंबियांच्या भावनांशी खेळत आहेत".
advertisement
( एका चुकीमुळं बरबाद झालं कपूर घराण्यातील या अभिनेत्याचं करिअर; आता करतो साईड रोल )
श्रेयसनं पुढे लिहिलंय, "माझी लहान मुलगी आहे जी दररोज शाळेत जाते. ती आधीच माझ्या आरोग्याबद्दल माझी काळजी करत असते. ही खोटी बातमी तिची भिती वाढवत आहे. तिला तिच्या शिक्षकांकडून, तिच्याबरोबरीच्या लोकांकडून येणाऱ्या अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे".
"ही माहिती पुढे पाठवणाऱ्यांना मी विराम देण्यास आणि तसे केल्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्याची विनंती करतो. अनेक लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. पण अशा बातम्यांमुळे त्यांच्याही भावना दुखावल्या जातील. माझ्या प्रिय कुटुंबाला त्रास होऊ शकतो. आमच्या आयुष्यात व्यत्यत आणेल अशा प्रकारचे विनोद करणं हे अत्यंत निराशाजनक आहे. तेव्हा तुम्ही अफवा पसरवता तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या एका व्यक्तीवर नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. लहान मुलांवर विशेष परिणाम होतो कारण त्यांना परिस्थिती पूर्णपणे समजत नसते ज्यामुळे त्यांना भावनिक त्रास होतो", असं श्रेयस म्हणाला.
"ज्यांनी ज्यांनी माझी विचारणा केली त्यांचे मी मनापासून आभारी आहे. तुमची काळजी आणि प्रेम हे माझ्यासाठी माझं जग आहे. ट्रोलर्सना माझी एक साधी विनंती आहे की, इतरांच्या आयुष्यातील किंमतीवर विनोद करू नका. तुमच्या बाबतीत असं काही घडावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. प्लिज संवेदनशील व्हा", असंही श्रेयसनं म्हटलं आहे.
