त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याचा खतरनाक लुक समोर आला आहे. हा अभिनेता 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमात व्हिलनच्या भुमिकेत दिसणार आहे. पण हा अभिनेता कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या या अभिनेत्याच्या चेहऱ्यावर रक्त, व्रण, उतार धडकी भरवणारी नजर पाहायला मिळतेय. काळ्यात क्रूरचा ठासून भरलेली आहे. आक्राळ विक्राळ रूप असलेला हा अभिनेता नेमका कोण आहे?
advertisement
फोटोमध्ये दिसणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सिद्धार्थ जाधव आहे. 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' या सिनेमात तो व्हिलनच्या भुमिकेत दिसणार आहे. शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमात त्याने उस्मान पारकर ही भुमिका केली होती. जी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज झालं आहे ज्यात सिद्धार्थ जाधव आक्राळ विक्राळ रुपात दिसतोय.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला, "पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटातील माझी ही भूमिका माझ्या आजवरच्या कारकिर्दीमधली सगळ्यात वेगळी आहे. या पात्रामध्ये जी क्रुरता आहे ती त्याच्या लूकमध्ये उतरणं खूप गरजेची होती. माझ्या या लूकचं पूर्ण श्रेय महेश सरांचं आहे. त्यांनी मला माझा एक फोटो पाठवायला सांगितला आणि त्यावर काम करून माझा हा लूक तयार केला. जेव्हा हा लूक माझ्याकडे आला, तेव्हा मी स्वतःच थक्क झालो. मी असाही दिसू शकतो? असा प्रश्न मला पडला. अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वी कधीच साकारली नाही. परंतु माझा महेश सरांवर पूर्ण विश्वास असल्याने मी सुद्धा या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. सध्यातरी मी भूमिकेविषयी जास्त काही बोलू शकत नाही, परंतु मला खात्री आहे की, प्रेक्षकांना माझं हे रूप नक्कीच आवडेल."
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' स्टारकास्ट
सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ जाधव हे मातब्बर कलाकार बघायला मिळणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा 31 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
