महेश काळे नेहमीच सिरियस मूडमध्ये दिसतात. त्यामुळे त्यांचे चाहते आणि प्रेक्षक मंडळीही त्यांना सतत प्रश्न विचारत असते की, “तुम्ही सतत अशा मूडमध्ये का असता?” अखेर महेश काळे यांनी या प्रश्नांची उत्तरे देत एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये त्यांचा कधीही न पाहिलेला अंदाज दिसतोय. व्हिडिओ पाहून तर त्यांच्या चाहत्यांना विश्वासच बसत नाहीये की, “हे महेश काळे आहेत आणि ते पण अशा अंदाजात.”
advertisement
महेश काळेंच्या व्हिडिओमध्ये नक्की काय?
महेश काळे यांनी त्यांच्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये त्यांनी चक्क अभिनय केलेला दिसतोय. त्यांचा मूड नेहमीपेक्षा वेगळा दिसतोय. सिरियस मूड नाही तर ते एकदम चील मूडमध्ये दिसत आहेत. 'दिलवाले' सिनेमाच्या गाण्याच्या म्युझिकवर त्यांनी हा व्हिडिओ बनवलाय. व्हिडिओमध्ये ते शाहरुखप्रमाणे स्टेशनवर पळताना दिसत आहेत, तर ट्रेनमध्ये चढून सिमरनसाठी हात देतानाचा सीन करताना दिसत आहेत. अशा कूल अंदाजात महेश काळे फार क्वचितच पाहायला मिळतात.
महेश काळे यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताच व्हायरल झाला. चाहते आणि प्रेक्षकांच्या भरपूर कमेंट व्हिडिओवर येत आहेत. महेश काळेंना अशा अंदाजात पाहून सर्वचजण चकित झाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.