Abhishek Aishwarya Divorce: अभिषेक-ऐश्वर्याचा घटस्फोट पक्का? बच्चन कुटुंबाकडून मिळाली मोठी हिंट, 'त्या' कृतीने वेधलं लक्ष
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Abhishek Aishwarya Divorce: बी-टाऊनमध्ये सध्या फेमस कपलच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. हे कपल दुसरं तिसरं कोणी नसून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन आहेत. दोघांमध्ये सध्या काही ठीक सुरू नसून दोघंही लवकरच वेगळे होणार असल्याचं म्हटलं जातंय.
मुंबई : बी-टाऊनमध्ये सध्या फेमस कपलच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. हे कपल दुसरं तिसरं कोणी नसून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन आहेत. दोघांमध्ये सध्या काही ठीक सुरू नसून दोघंही लवकरच वेगळे होणार असल्याचं म्हटलं जातंय. अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत ज्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना हवा मिळत आहेत. अशातच अशी एक गोष्ट घडली ज्यामुळे दोघंही घटस्फोट घेणार यावर जवळपास शिक्कामोर्तबच झाला. असं नेमकं काय घडलं?
नुकताच 1 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या राय बच्चनचा वाढदिवस होता. मात्र यावेळी असं काही घडलं, अभिषेकने असं काही केलं ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा जवळपास खऱ्या आहेत यावर शिक्कामोर्तब मिळालेला दिसला. ऐश्वर्याच्या वाढदिवशी मित्रपरिवार सर्वांनी दिला शुभेच्छा दिल्या. मात्र तिचा नवरा अभिषेक बच्चन आणि सासरकडची मंडळी यांनी कोणीच दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या दिसल्या नाहीत. या खास दिवशीही बच्चन कुटुंबाने आपल्या सुनेकडे दुर्लक्ष केलं. त्यांचे सासरे अमिताभ बच्चन किंवा सासू जया बच्चन यांनीही तिला शुभेच्छा दिल्या नाहीत.
advertisement
अभिषेक बच्चनने ऐश्वर्यासाठी काहीच पोस्ट केलं नाही त्यामुळे लोकांनी त्याला खूप ट्रोल केलं. अभिषेकच्या या कृतीमुळे चाहते नाराजही झाले. त्यामुळे आता अभिषेक आणि ऐश्वर्या घटस्फोट घेणार हे जवळपास खरंच असल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर अभिषेक बच्चनच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या बातम्या पसरत आहेत. निम्रत कौरसोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. निम्रत कौरमुळे आता अभिषेक ऐश्वर्याला घटस्फोट देणार असल्याचं म्हटलं जातंय. सोशल मीडियावर एवढ्या चर्चा सुरू आहे मात्र याविषयी ऐश्वर्या किंवा अभिषेक दोघांनीही मौन बाळगलं. त्यामुळे अद्याप सत्य काय आहे हे समोर आलं नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2024 12:38 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Abhishek Aishwarya Divorce: अभिषेक-ऐश्वर्याचा घटस्फोट पक्का? बच्चन कुटुंबाकडून मिळाली मोठी हिंट, 'त्या' कृतीने वेधलं लक्ष