रविवारी भाजप नेते विनोद तावडे यांनी ट्विटरवर मैथिली ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबासोबतच्या भेटीचे फोटो शेअर केला. ज्यामुळे मैथिली ठाकूर विधानसभा निवडणूक लढवत असल्याच्या अफवांना वेग आला. त्यांच्या पोस्टमध्ये तावडे म्हणाले की, "1995 मध्ये बिहारमध्ये लालू प्रसाद यादव सत्तेत आल्यानंतर जे कुटुंब बिहार सोडून गेले होते, त्या कुटुंबातील कन्या आणि सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकुर आता बदलत्या बिहारचा वेग पाहून पुन्हा बिहारमध्ये परत यायची इच्छा व्यक्त करत आहेत."
advertisement
( Renuka Shahane : घटस्फोटित रेणुका शहाणेंच्या प्रेमात कसे पडले आशुतोष राणा? फिल्मी आहे Love Story )
आज गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि मी त्यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की, बिहारच्या जनतेसाठी आणि बिहारच्या विकासासाठी त्यांचं योगदान अपेक्षित आहे. बिहारचा सामान्य नागरिक त्यांच्या या योगदानाची अपेक्षा करतो आणि त्या नक्कीच ही अपेक्षा पूर्ण करतील, असा आम्हाला विश्वास आहे.
त्यांनी सांगितले की त्यांनी आणि नित्यानंद राय यांनी गायिकेला लोकांच्या आणि बिहार राज्याच्या विकासासाठी असलेली त्यांची वचनबद्धता पूर्ण करण्याचे आवाहन केले. विनोद तावडे यांची पोस्ट पुन्हा शेअर करताना मैथिली ठाकूर यांनी लिहिले, "जे लोक बिहारसाठी मोठी स्वप्नं पाहतात त्यांच्यासोबत झालेली प्रत्येक चर्चा मला दूरदृष्टी आणि सेवाभावाची ताकद आठवून देते. मनःपूर्वक आदर आणि कृतज्ञता व्यक्त करते. श्री नित्यानंद राय जी आणि श्री विनोद श्रीधर तावडे जी
मैथिली ठाकूर कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?
निवडणूक लढवण्याच्या चर्चांना उत्तर देत मैथिली ठाकूर म्हणाली की, "मीही या गोष्टी टीव्हीवर पाहत आहे. अलीकडेच मी बिहारला भेट दिली. तिथे मी नित्यानंद राय तसेच विनोद तावडे यांची भेट घेण्याची संधी मिळाली. आम्ही बिहारच्या भविष्यासंदर्भात चर्चा केली. सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण पाहू या पुढे काय होतं. मला माझ्या गावच्या मतदारसंघातून उभं राहायला आवडेल, कारण माझं त्या ठिकाणाशी भावनिक नातं आहे."
बिहार निवडणुकांमध्ये ती कोणाला पाठिंबा देत आहे या प्रश्नावर म्हणाली, "या विषयी मी सध्या काहीही बोलू इच्छित नाही. पण देशाच्या विकासासाठी शक्य तितकं योगदान देण्यासाठी मी ठामपणे उभी आहे."