प्रसिद्ध गायक आणि गीतकार यासर देसाई याचा हा व्हिडीओ आहे. त्याने वांद्रे -वरळी सी लिंकच्या रेलिंगवर चढून हा व्हिडीओ शूट केला आहे. रेलिंग उभा राहून दोन्ही हात मोकळे सोडून तो उभा आहे. मध्येच तो मागे वळून कॅमेरात बघताना दिसतोय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वांद्रे पोलिसांनी गायक यासर देसाई विरोधात गुन्हा दाखल केला आहे. IPC कलम 285, 281 आणि 125 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
वांद्रे पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता गंभीर दखल घेतली असून पोलीस तपास करत आहेत. दरम्यान FIR दाखल केल्यानंतर गायक यासर याच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. वांद्रे सी लिंकच्या रेलिंगवर तो का चढला होता? तो आत्महत्या करण्यासाठी गेला होती की कोणत्या नव्या प्रोजेक्टचं शूटिंग करत होता याची माहिती समोर आलेली नाही. पोलीस याचा तपास करत आहेत.
यासर वर्कफ्रंट
गायक यासरबद्दल सांगायचं झाल्यास, त्याचं रुठा मेरा इश्क हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. प्रेम, विरह आणि भावना व्यक्त करणारं हे गाणं आहे. यासरसोबत अमोल श्रीवास्तव आणि अभिषेक टॅलेंटेड यांनी हे गाणं गायलं आहे.
यासर देसाई हिट साँग
2016 मध्ये आलेल्या बेईमान लव्ह या सिनेमातून त्याने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. यासर देसाईला 'ड्राइव्ह','मखना', सुकून मधील 'दिल को करार आया', 'शादी में जरूर आना' मधील 'पल्लो लटके' आणि 'गोल्ड ए 1' मधील 'नैनो ने बांधी' यांसारख्या लोकप्रिय गाण्यांमुळे ओळख मिळाली. 'पल्लो लटके', 'मखना' ही गाणी तर खूप हिट झाली.