Guru Dutt Love Stoy: कुटुंब मोडलं, करिअरही उद्ध्वस्त झालं, अभिनेत्रीच्या प्रेमात बर्बाद झालेले गुरु दत्त

Last Updated:

Guru Dutt Love Stoy: बॉलिवूडने सिल्व्हर स्क्रीनवर प्रेक्षकांना अनेक प्रेमकथांचा अनुभव दिला, ज्यातील काही पूर्णत्वास गेल्या तर काही अपूर्णच राहिल्या.

अभिनेत्रीच्या प्रेमात बर्बाद झालेले गुरु दत्त
अभिनेत्रीच्या प्रेमात बर्बाद झालेले गुरु दत्त
मुंबई : बॉलिवूडने सिल्व्हर स्क्रीनवर प्रेक्षकांना अनेक प्रेमकथांचा अनुभव दिला, ज्यातील काही पूर्णत्वास गेल्या तर काही अपूर्णच राहिल्या. प्रेक्षकांनाही बहुतेकदा अशाच चित्रपटांचा आस्वाद घ्यायला आवडतो, ज्याचा शेवट ‘हॅपी एंडिंग’ने होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, या प्रेमकथांचे दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शकांचा किंवा त्यात अभिनय करणाऱ्या कलाकारांचा खऱ्या आयुष्यातला प्रवास कसा असेल? त्यांनाही त्यांच्या जीवनात तो हमसफर मिळाला असेल का ज्याच्यावर त्यांनी प्रेम केलं?
आज आपण अशाच एका कलाकाराची कहाणी सांगणार आहोत, ज्याने पडद्यावर एकापेक्षा एक चित्रपट सादर केले, पण त्याचं स्वतःचं जीवन मात्र नरकासमान होतं. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक गुरुदत्त आता आपल्या सोबत नाहीत, पण त्यांचे चित्रपट, गाणी आणि त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी अजूनही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते. गुरुदत्त हे असे कलाकार होते जे विवाहित असूनही दुसऱ्याच एका स्त्रीच्या प्रेमात पडले, आणि त्यामुळे त्यांचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झालं.
advertisement

जेव्हा गुरुदत्तच्या आयुष्यात आली ती एक हसीना

गुरुदत्त यांचं खरं नाव वसंतकुमार शिवशंकर पादुकोण होतं. घरात गरीबी असल्यामुळे ते दहावीनंतर शिक्षण घेऊ शकले नाहीत. पण त्यांना लहानपणापासूनच संगीत आणि कला याची विशेष आवड होती. त्यामुळे त्यांना उदय शंकर इंडिया कल्चर सेंटरमध्ये शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांनी तेथे प्रवेश घेतला. इथे त्यांनी नृत्यशिक्षण घेतलं आणि ते कोरिओग्राफर बनले.
advertisement
त्यांनी करिअरची सुरुवात कोरिओग्राफर म्हणून केली. 1953 साली त्यांचा विवाह गीता दत्त यांच्याशी झाला. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि हळूहळू त्यात फाटाफूट व्हायला सुरुवात झाली. असं म्हटलं जातं की, गुरुदत्त 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री वहीदा रहमान यांच्या प्रेमात पडले होते.

वहीदाच्या प्रेमात गुरुदत्त झाले वेडे

सांगितलं जातं की, वहीदा रहमान त्यांच्या आयुष्यात आल्यापासून गुरुदत्त आणि गीतामध्ये वाद वाढू लागले. गुरुदत्त वहीदाच्या प्रेमात इतके गुंतले होते की त्यांना तिचीच आठवण सतत भेडसावत होती. ते तिच्या प्रेमात इतके मग्न झाले की पत्नी आणि कुटुंब विसरत चालले होते.
advertisement
NDTV च्या एका रिपोर्टनुसार, गीताने एकदा गुरुदत्तला रंगेहाथ पकडण्यासाठी वहीदाच्या नावाने एक पत्र पाठवलं आणि त्यात लिहिलेल्या ठिकाणी गुरुदत्त आपल्या मित्र अबरारसोबत पोहोचले. काही वेळातच गीता आपल्या मैत्रिणीसोबत तिथे पोहोचली. असं सांगितलं जातं की, या प्रकारामुळे गुरुदत्त खूप चिडले आणि त्यांनी गीतावर हात उचलला.

"जिंदगी नरक हो गई है"

या घटनेनंतर दोघे वेगळे झाले. ‘गुरुदत्त – द अनसॅटिसफाईड स्टोरी’ या पुस्तकानुसार, एकदा गीतादत्त यांनी वहीदाबद्दल बोलताना म्हटलं होतं "जेव्हापासून ती आपल्या आयुष्यात आली, तेव्हापासून जीवन नरक बनलंय." गुरुदत्त यांच्या या नात्याला गीता सहन करू शकल्या नाहीत आणि आपल्या तिन्ही मुलांना घेऊन आईच्या घरी निघून गेल्या.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Guru Dutt Love Stoy: कुटुंब मोडलं, करिअरही उद्ध्वस्त झालं, अभिनेत्रीच्या प्रेमात बर्बाद झालेले गुरु दत्त
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement