Guru Dutt: 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? दारु प्यायली, झोपेच्या गोळ्या खाल्ल्या, गुरुदत्तची आत्महत्या की घातपात?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Guru Dutt: भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते गुरु दत्त. 9 जुलैला त्यांचा जयंती असते. त्यांची कहाणी जेवढी प्रेरणादायी तेवढीच दुःखद.
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते गुरु दत्त. 9 जुलैला त्यांचा जयंती असते. त्यांची कहाणी जेवढी प्रेरणादायी तेवढीच दुःखद. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहिब बीवी और गुलाम’ यांसारख्या चित्रपटांनी भारतीय सिनेमाच्या इतिहासात अमिट ठसा उमटवणाऱ्या गुरु दत्त यांचा मृत्यू आजही अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण करतो. गुरुदत्त यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलं होतं? याविषयी जाणून घेऊया.
गुरुदत्त स्ट्रगल
9 जुलै 1925 रोजी कर्नाटकात जन्मलेले वसंतकुमार शिवशंकर पादुकोण, म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या गुरु दत्त यांना सिनेमाविषयीची आवड लहानपणापासूनच होती. त्यांनी त्यांच्या प्रतिभेच्या बळावर केवळ बॉलिवूडचं नव्हे तर भारतीय सिनेमाचं स्वरूप बदलून टाकलं. पण वैयक्तिक आयुष्यात मात्र गुरु दत्त यांचा प्रवास खडतर होता.
advertisement
गुरुदत्तच्या मृत्यीच्या रात्री काय घडलं?
त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील संघर्ष, मानसिक अशांतता, आणि आर्थिक संकट या सगळ्यांमुळे ते आतून कोसळले होते. त्यांना निद्रानाशाचा त्रास होता, ज्यामुळे झोपेच्या गोळ्यांचं सेवन त्यांचं रोजचंच झालं होतं. यातच एका रात्री, दारू आणि झोपेच्या गोळ्यांच्या घातक मिश्रणामुळे त्यांचा 10 ऑक्टोबर 1964 रोजी मृत्यू झाला. वयाच्या केवळ 39व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
advertisement
गुरुदत्त यांचा मुलगा अरुण दत्त आणि भाऊ देवी दत्त यांचं म्हणणं आहे की, हा मृत्यू अपघाती होता. त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता नेहमीच नाकारली. " त्या दिवशी त्याने पतंग आणि मांज्याची मागणी केली होती, स्वयंपाकही केला होता. असा माणूस आत्महत्या करेल का?" असं भावनिक वक्तव्य देवी दत्त यांनी केलं होतं. गुरु दत्त यांच्या मृत्यूपूर्वीचा दिवस नेहमीसारखा व्यस्त होता. शूटिंग, मित्रमैत्रिणींसोबत गप्पा, कुटुंबासाठी खरेदी. पण त्याच्या मृत्यूनंतर केवळ प्रश्नच उरले ही आत्महत्या होती की दुर्दैवी अपघात?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 08, 2025 8:55 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Guru Dutt: 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? दारु प्यायली, झोपेच्या गोळ्या खाल्ल्या, गुरुदत्तची आत्महत्या की घातपात?


