'पप्पी दे पारूला' फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर हिच्याविषयी आपण बोलत आहोत. स्मिता गोंदकर तिच्या कुटुंबासोबत दुबईत राहत होती. पण युद्धजन्य परिस्थितीत ती अडकली. ती नुकतीच दुबईतून भारतात परतली आहे. तिथे नेमकं काय सुरू आहे? तिला भारतात येण्यासाठी मदत कशी मिळाली हे देखील तिनं सांगितलं.
( 'धमाक्यांचे आवाज, दारं खिडक्या हलतात', लेकीसोबत दुबईत अडकलीये लारा दत्ता; VIDEO शेअर करत झाली इमोशनल )
advertisement
स्मिताने पोस्ट लिहित म्हटलं, "गेल्या काही दिवसांत परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक होती. मोठमोठे स्फोटांचे आवाज, थरथरणाऱ्या खिडक्या, रात्री आकाशात झेपावणाऱ्या मिसाइल्सचे प्रकाश, इंटरसेप्शन आणि त्याचे अवशेष, तसेच दिवसा दिसणारे ढगांसारख्या आकृती. हे सगळं अनुभवताना आम्ही सतत आशा करत होतो की परिस्थिती लवकरच शांत होईल आणि आम्ही लवकरच घरी परतू. मात्र हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे आणि वारंवार बुकिंग व चेक-इन करूनही दररोज फ्लाइट रद्द होत होती. माझ्यासोबत कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असल्यामुळे घरी परतणं जवळपास अशक्य वाटू लागलं होतं."
"या कठीण प्रसंगी मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, श्री. मंगेश देसाई आणि अतिरिक्त आयुक्त श्री. राहुल घेठे यांचे मी मनःपूर्वक आणि प्रामाणिक आभार मानते. त्यांच्या तत्काळ लक्ष घातल्यामुळे आणि सातत्यपूर्ण मदतीमुळे आमच्यासाठी मोठा दिलासा मिळाला. राहण्याच्या व्यवस्थेपासून, पिक-अपची सोय ते भारतात सुरक्षित परतण्यापर्यंतचा प्रवास. प्रत्येक पावलावर त्यांनी घेतलेले प्रयत्न अत्यंत आश्वासक होते."
स्मिताने शेवटची सगळ्यांचे आभार मानत म्हटलं, "आपल्या जलद कृतीमुळे आणि पाठिंब्यामुळे केवळ माझं कुटुंबच नव्हे तर इतर अनेक अडकलेल्या भारतीयांनाही सुरक्षितपणे मायदेशी परतता आलं. अशा गंभीर परिस्थितीत दाखवलेली तत्परता आणि नागरिकांप्रती असलेली बांधिलकी ही मजबूत नेतृत्व आणि खरी काळजी दाखवते. या कठीण काळात आपल्या सरकारने आपल्या नागरिकांसोबत ठामपणे उभं राहिलेलं पाहून मला भारतीय असल्याचा अतिशय अभिमान वाटतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार." स्मिताने पोस्टसोबत उपमुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉलद्वारे साधलेल्या संभाषणाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
