सैफ आणि करीनाने ऑक्टोबर 2012 मध्ये अत्यंत खाजगी पद्धतीत लग्न केलं. सैफ-करीनाच्या या धाडसी निर्णयामुळे नंतर सोहा आणि कुणाल यांच्या आंतरजातीय लग्नावर फारशी टीका झाली नाही. सोहाने एका यूट्यूब चॅनेलवर नयनदीप रक्षित यांच्याशी बोलताना सांगितले की, तिला आपल्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल कधीही विरोध जाणवला नाही. सोहा म्हणाली,"माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं हे आहे की माझ्या जवळची आणि ज्यांच्याबद्दल मला खरंच काळजी आहे ते माझ्या सोबत आहेत. लोकांची स्वतःची मतं असतात आणि ती असणंदेखील महत्त्वाचं आहे."
advertisement
मालिकेतून काढलं अन् 'ती'च्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडला होता सुबोध भावे, सांगितला तो किस्सा
सैफ-करीनाच्या लग्नावेळी झालेला मोठा वाद
सोहा पुढे म्हणाली,"जर लोकांनी द्वेष केला किंवा टीका केली, तरी मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कुटुंबाचा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचा पाठिंबा. जेव्हा सैफ आणि करीना यांचं लग्न झालं, तेव्हा अनेक वाद निर्माण झाले होते. लव्ह जिहाद, घरवापसी अशा पद्धतीचे बातम्यांचे मथळे होते. अशा गोष्टी होतात तेव्हा कुटुंबाचा आणि जोडीदाराचा पाठिंबा महत्त्वाचा असतो".
रणधीर कपूरांना मिळाले होते धमकीचे पत्र
सैफ अली खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, करीना कपूरचे वडील रणधीर कपूर यांनादेखील काही धमकीची पत्र मिळाली होती. पण सैफने या धमक्यांमुळे कधीच भीती दाखवली नाही. त्याने सांगितले की,"कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्याला धीर मिळाला. माझ्या पालकांनाही 1960 च्या दशकात अशाच टीका सहन कराव्या लागल्या होत्या. धमकी देणं आणि ती प्रत्यक्षात आणणं यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे मी नेहमी शांत आणि ठाम राहिलो".
शर्मिला टागोर यांनाही मिळाल्या होत्या धमक्या
सैफच्या या विचारसरणीने करीना कपूरलाही धैर्य मिळाले. सैफ आणि करीनाने एकत्रितपणे या सगळ्या अडचणींना सामोरं गेलं आणि आपलं प्रेम पुढे नेत राहिले. त्यांचं हे धैर्य नंतर सोहा आणि कुणालसाठीही प्रेरणा ठरलं.
शर्मिला टागोर यांनीदेखील त्यांच्या लग्नाच्या काळातील आठवणी शेअर केल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, कोलकात्यात त्यांच्या लग्नादरम्यान त्यांच्या कुटुंबाला धमक्या मिळाल्या होत्या, ज्यामध्ये लिहिलं होतं – “बुलेट्स बोलेंग”. त्यामुळे कुटुंब थोडं चिंतेत होतं. पण तरीही त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अखेरीस त्यांचं लग्न आनंदात आणि शांततेत पार पडलं.