सोहम आणि पूजा यांच्या रिसेप्शन पार्टीला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री रोहिणी हंडगड्डी, अजिंक्य देव,अशोक सराफ, निवेदिता सराफ, क्रांती रेडकर, तुषार दळवी, श्रेयस तळपदे, सोनाली कुलकर्णी, कविता लाड अशा अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे तसंच संजय राऊत यांनीही सोहम आणि पूजच्या रिसेप्शनला हजेरी लावून त्यांच्या शुभाशीर्वाद दिले.
advertisement
( 35 वर्षांआधी 50 रुपयात झालेलं 'भावोजीं'चं लग्न, आदेश-सुचित्राची फिल्मी Love Story )
पूजा आणि सोहम यांचा रिसेप्शनमधील एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात स्टेजवर अभिनेते अजिंक्य देव दोघांना शुभेच्छा देण्यासाठी गेले आहेत. ते आदेश बांदेकरांची भेट घेतात. अजिंक्य देव यांना पाहून आदेश बांदेकर आणि सोहम प्रचंड खूश झाल्याचं पाहायला मिळतंय. अजिंक्य देव यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी सगळे उभे राहतात तोच आदेश बांदेकर अजिंक्य देव यांना कोणी तरी आल्याचं सांगतात. अजिंक्य देव त्यांची भेट घेण्यासाठी जातात. तेवढ्यात मागे पूजा सोबत उभा असलेला सोहम बाजूला कोणाशीतरी बोलायला जातो आणि तिथेच उभा राहतो. पुन्हा अजिंक्य देव फोटो काढण्यासाठी जागेवर येतात तेव्हा सोहम तिथे नसतो. तो दुसऱ्याच ठिकाणी फोटोसाठी पोझ देऊन उभा असल्याचं दिसतं.
बाजूला उभा असलेला सोहम गायब झाल्याचं पूजाच्या लक्षात येतं आणि ती त्याला इथे ये म्हणत बोलावते. सोहम देखील हसतो आणि पूजाच्या बाजूला येऊ उभा राहतो. हे सगळं पाहून बाजूला उभ्या असलेल्या सुचित्रा बांदेकर आणि अजिंक्य देव यांना हसू आवरत नाही.
रिसेप्शनसाठी सोहमने निळ्या रंगचा सूट घातला होता तर पूजा व्हाइट कलरच्या डिझाइनर लेहंग्यामध्ये दिसली. दोघेही अत्यंत सुंदर दिसत होते.
