सोहमचं 'ठरलं तर मग'! 35 वर्षांआधी 50 रुपयात झालेलं 'भावोजीं'चं लग्न, आदेश-सुचित्राची फिल्मी Love Story

Last Updated:
Aadesh - Suchitra Bandekar Love Story : आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम लवकरच लग्नबंधनात अडकरणार असल्याची चर्चा आहे. सोहमचं लग्न ठरलं तर मग पण आदेश आणि सुचित्रा यांच्या लग्नाची गोष्ट तुम्हाला माहितीये का?
1/12
मराठी सिनेसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे भावोजी आता सासरे होणार. सूत्रसंचालक, अभिनेते आणि निर्माते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यांच्या लग्नाची सध्या चर्चा सुरू आहे.

advertisement
2/12
सध्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

3/12
सोहम आणि पूजा यांचं लवकरच लग्न होणार आहे असे संकेत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या नुकत्याच आलेल्या एका मुलाखतीतून मिळाले आहेत.

4/12
चला आता सोहम बांदेकरचं ठरलं तर मग, पण तुम्हाला माहिती आहे का 35 वर्षांआधी आदेश आणि सुचित्रा यांचंही असंच ठरलं होतं. दोघांनी अवघ्या 50 रुपयांमध्ये लग्न केलं होतं. पाहूयात आदेश आणि सुचित्रा यांची फिल्मी लव्ह स्टोरी.

5/12
आदेश बांदेकर हे होम मिनिस्टर या कार्यक्रमातून घराघरात पोहोचले. पण होम मिनिस्टरच्याही आधी त्यांनी बरीच काम केली होती. नोकरी नसताना त्यांनी सुचित्राशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

6/12
आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे रुपारेल कॉलेजमध्ये होते. सुचित्राला पाहता क्षणी ते प्रेमात पडले. आदेश यांच्या प्रपोजलला सुचित्रा यांनी होकार दिला होता.

7/12
एकदा आदेश यांनी संध्याकाळी 5 वाजता दादरच्या एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं. एका मैत्रिणीला घेऊन त्या भेटायला गेल्या पण आई-वडील पाहतील या भितीने त्या पुन्हा निघून गेल्या. सुचित्रा रात्री 8 वाजता त्यांच्या घरी पोहोचल्या तेव्हा आदेश सुचित्राच्या आईशी गप्पा मारत होते. त्यांनंतर सुचित्राची आई आणि आदेश घराबाहेर पडले. बस स्टॉपवर पोहोचून मला एक काम आहे असं सांगून तिथून आदेश तिथून निसटले.

8/12
थोड्या वेळाने ते पुन्हा सुचित्रा यांना भेटले आणि त्यांना चिडून विचारलं की 'भेटायचं नव्हतं तर का बोलावलं? मी तुला आज महालक्ष्मी-सिद्धिविनायकला येणार होतो.' आता मला पाच मिनिटात होकार किंवा नकार दे. नकार दिलास तर पुन्हा कधी भेटणार नाही आणि मागेही येणार नाही.

9/12
थोड्यावेळाने आदेश निघून जात असताना सुचित्रा यांनी 'कधी जायचं महालक्ष्मीला' असं म्हटलं आणि फिल्मी स्टाइलनं होकार दिला.

10/12
सुचित्रा आणि आदेश यांची लव्ह स्टोरी सुरू झाले पण सुचित्रा यांच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. कारण त्या काळात आदेश यांचा स्ट्रगलिंग काळ सुरू होता.

11/12
एके दिवशी क्लासला जातेय असं सांगून आदेश आणि सुचित्रा यांनी वांद्रे कोर्टात जाऊन लग्न केलं. लग्नासाठी फक्ता 50 रुपये खर्च आला. आदेश यांनी सुचित्राला लग्न 500 रुपयांचं मंगळसूत्र घातलं होतं ज्यात एक सोन्याचा मुहूर्त मणी होता. तो मुहूर्त मणी सुचित्रा यांनी आजही जपून ठेवला होता.

12/12
नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत सुचित्राचे बाबा तिच्याशी बोलत नव्हते. या काळात मला माहेर नव्हतं, असं सुचित्रा यांनी राजश्री मराठीशी बोलताना सांगितलं.

Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement