पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई, PI राहुल जगदाळे आणि API तोडकरी सेवेतून बडतर्फ

Last Updated:

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ रोजी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्शे या लक्झरी कारने दुचाकीस्वारांना धडक दिली, त्यात दोघांचा मृत्यू झाला होता.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण
पुणे : राज्यभर चर्चेत राहिलेले पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्य सरकारने मोठी कारवाई केली असून येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ रोजी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्शे या लक्झरी कारने दुचाकीस्वारांना धडक दिली, त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. बांधकाम व्यावसायिकाच्या पोरगा विशाल अग्रवाल याने मद्यधुंद अवस्थेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन तरुणांना चिरडले होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत प्रकरण गेले होते. पोलिसांनीही बांधकाम व्यावसायिकाच्या लेकाला मदत केल्याचा आरोप झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.
advertisement
दरम्यान, अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलिस ठाण्याचे २ अधिकारी शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहेत. दीड वर्षानंतर येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले या दोघांना पाच वर्ष पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
advertisement

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गृहखात्याचा दणका 

प्रत्यक्षदर्शी म्हणून घटनास्थळी पोहचलेल्या दोन पोलिसांनी ही माहिती कंट्रोल रुमला न कळविल्याने अपघाताची माहिती रात्री ऑन ड्युटी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचली नव्हती. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही गृहखात्याने दणका दिला.

आरोपीला निबंध लिहायला सांगितल्यावर देशभरात संतापाची लाट

आरोपीने गुन्हा केला त्यावेळी तो १७ वर्षे ८ महिन्यांचा होता. केवळ चार महिने बाकी असल्याने त्याला प्रौढ म्हणून वागवण्याची मागणी पुणे पोलिसांनी न्यायालयाला केली होती. दुसरीकडे बाल न्याय मंडळाने अवघ्या १४ तासांत आरोपीला १०० शब्दांचा निबंध लिहायला सांगून जामीन मंजूर केला होता. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई, PI राहुल जगदाळे आणि API तोडकरी सेवेतून बडतर्फ
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement