Success Story: कॅन्सरच्या वेदना क्रोशानं दिली जगण्याची उमेद, जठर काढला तरी नाही सोडली जिद्द; क्रोशानं बदललं आयुष्य

Last Updated:
Biharच्या गावातून आलेल्या Gufranने क्रोशा कलेच्या बळावर कॅन्सरशी झुंज दिली. James Ferreiraसोबत काम, Lakme Fashion Weekमध्ये डिझाइन, crochet.by.gufranवर यश मिळवले.
1/7
जीवन-मरणाच्या लढाईत एखाद्या कलेने जगण्याची आशा आणि उमेद द्यावी, याचा अनुभव एका तरुणाने घेतला आहे. बिहारच्या एका छोट्याशा गावातून आलेला हा तरुण, ज्याला परिस्थितीमुळे १२ वी नंतर शिक्षण सोडावे लागले, त्याने अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतही क्रोशा कलेच्या बळावर स्वतःचे आयुष्य आणि स्वप्ने वाचवली. या तरुणाचे नाव आणि कलेचा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे.

advertisement
2/7
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे पुढचे शिक्षण घेणे या तरुणासाठी कठीण झाले आणि त्याचे शिक्षण सुटले. तेव्हापासूनच त्याची क्रोशा कला त्याचा सर्वात मोठा आधार बनली. शिवणकाम येत असल्याने, त्याच्या आतली सर्जनशीलता त्याला शांत बसू देत नव्हती. २०२३ मध्ये, याच कलेला ओळख मिळवून देण्यासाठी तो मुंबईत आला. सुरुवातीला मित्रांच्या मदतीने त्याला छोटी-छोटी कामे मिळाली.

3/7
त्याने क्रोशापासून एक सुंदर फूल तयार केलं. त्याचे हे काम पाहून मित्र इतके अवाक झाले की, त्यांना विश्वासच बसत नव्हता. तिथूनच त्याच्या सोशल मीडियाच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि त्याची क्रोशा कलेची एक 'रील' प्रचंड व्हायरल झाली.

4/7
या यशाच्या वाटेवर असतानाच, प्रसिद्ध डिझायनर जेम्स फरेरा (James Ferreira) यांनी त्याला सोबत काम करण्याची संधी दिली. ही केवळ संधी नव्हती, तर त्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पडलेले एक मोठे पाऊल होते. मात्र, त्याच वेळी त्याच्या आयुष्यात सर्वात मोठे वादळ आले.

5/7
त्याला अति प्रचंड पोटदुखीचा त्रास वाढला. चाचण्या केल्यावर त्याला पोटाचा कॅन्सर असल्याचे समजले. कॅन्सरवर उपचार म्हणून त्याचे जठर  काढून टाकण्यात आले. कॅन्सर, वेदना आणि हॉस्पिटलच्या चार भिंतींमध्ये, क्रोशाचे ते रंगीत धागेच त्याचे सर्वात मोठे आधार बनले. केमोथेरपी सुरू असतानाही त्याची बोटं क्रोशाचे काम विणण्यात मग्न होती.

6/7
 "केमो थेअरपीदरम्यान देखील माझी बोटं क्रोशाचं काम करत होती. हात थांबत नव्हते. कॅन्सर, वेदना आणि हॉस्पिटलच्या चार भिंतींमध्ये हे धागे सर्वात जास्त माझा आधार बनले," अशी प्रतिक्रिया या तरुणाने दिली. आजारी असतानाही त्याने तयार केलेल्या वस्तू एक्झिबिशन आणि वर्कशॉपपर्यंत पोहोचल्या. विशेष म्हणजे, लॅकमे फॅशन वीकमध्ये (Lakme Fashion Week) देखील त्याने तयार केलेले क्रोशाचे डिझाइन वापरले गेले.

7/7
हा तरुण आज स्वतःचा कंटेन्ट (Content) तयार करतो. त्याच्या प्रत्येक डिझाइनमागे एक वेगळी कहाणी आहे. त्याच्यासाठी ही कला केवळ एक रोजगार नाही, तर जगण्याची आशा, उमेद आणि मोठा आधार आहे. जीवन-मरणाच्या लढाईत याच कलेने त्याला जगण्याची नवी उमेद दिली आहे. या तरुणाचं इन्टावर crochet.by.gufran नावाने अकाउंट आहे. त्याला तिथूनही क्रोशाच्या अनेक ऑर्डर्स मिळतात.

ED Raid Baramati : बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठी अपडेट
बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ
  • बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ

View All
advertisement