2025 मध्ये या 8 सेलिब्रिटींच्या आयुष्यात वादळ! एकीला फॉरेनर नवऱ्याने फसवलं, दुसरीचा 15 वर्षांचा संसार मोडला
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Year Ender 2025 : मराठीसह हिंदी-इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचा 2025 या वर्षात संसार मोडला आहे. तर काही संसार सुरू होण्याआधीच विभक्त झाले आहेत.
युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal Dhanashree Verma) : 2025 या वर्षाची सुरुवातच युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी झाली. भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा होती. अखेर 2025 मध्ये त्यांनी अधिकृतरित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
पलाश मुच्छल -स्मृती मानधना (Palash Muchhal Smriti Mandhana) : भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या ब्रेकअपची चांगलीच चर्चा रंगली. 23 नोव्हेंबर 2025 रोजी स्मृती आणि पलाश विवाहबंधनात अडकणार होते. पण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांचं लग्न मोडल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. दरम्यान स्मृतीने खास पोस्ट करत लग्न मोडलं असल्याचं जाहीर केलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
संजीव सेठ - लता सभरवाल (Sanjeev Seth Lata Sabherwal) : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध जोडपं संजीव सेठ आणि लता सभरवाल यांनी जून 2025 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वेगळं होण्याची घोषणा केली. लग्नाच्या 15 वर्षांनी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.









