ईव्ही कारचालकांना मोठा दिलासा, भरलेला टोल परत मिळणार; सरकारची अधिवेशनात घोषणा
Last Updated:
Electric Vehicle Toll Refund : महाराष्ट्र सरकारने ईव्ही चालकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. विधानसभा अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे भरलेला टोल परत मिळणार. एक्स्प्रेस वे, अटल सेतू आणि समृद्धी मार्गावर टोल माफी लागू होणार असून ईव्ही मालकांना लाभ मिळेल.
महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहन कारचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आदेशानुसार ईव्ही गाड्यांकडून टोल शुल्क न घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जीआर लागू केल्यापासून या गाड्यांकडून घेतलेले टोल परत मिळवता येणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या घोषणेने ईव्ही वाहनधारकांमध्ये समाधान निर्माण झाले आहे.
advertisement
advertisement
महाराष्ट्रात सध्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन कमी आहेत. राज्यातील मागणी लक्षात घेता साधारणपणे 120 नवीन चार्जिंग स्टेशन उभारावे लागतील. ही सोय निर्माण झाल्यास ईव्ही वाहनधारकांना प्रवास करताना चार्जिंगची सोय मिळेल आणि त्यांच्या वाहनांचा वापर सुलभ होईल. चार्जिंग स्टेशनच्या कमतरतेमुळे अनेक वेळा प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे नवीन स्टेशन उभारणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
अध्यक्षांनी दिलेल्या आदेशामुळे ईव्ही वाहनधारकांना त्यांच्या वाहनांच्या वापरावर आर्थिक भार कमी होईल. टोल शुल्क परत मिळाल्यामुळे वाहनधारकांना आर्थिक फटका बसणार नाही. तसेच राज्यातील ईव्ही वाहनांची संख्या वाढण्यासही मदत होईल. यामुळे पर्यावरण संरक्षणासही चालना मिळेल, कारण इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषणात लक्षणीय घट होऊ शकते.
advertisement
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ईव्ही वाहनधारकांचे आत्मविश्वास वाढेल आणि नव्या इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीस प्रोत्साहन मिळेल. दीर्घकालीन दृष्टीकोनातून विचार करता हे पाऊल महाराष्ट्रात पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली विकसित करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ईव्ही वाहनांच्या वापरामुळे पेट्रोल आणि डिझेलवरचा अवलंब कमी होईल शिवाय ऊर्जा बचत होईल.
advertisement









