'ही गोष्ट जमली तरच आई होईन', हृता दुर्गुळेनं अखेर प्रेग्नंसीच्या प्रश्नांवर दिलं उत्तर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Hruta Durgule on Pregnancy : अभिनेत्री हृता दुर्गुलेच्या लग्नाचा चार वर्ष झाली आहेत. ती आई कधी होणार असा प्रश्न तिला अनेकदा विचारला जातो. अखेर हृताने या प्रश्नांवर मौन सोडलं आहे.
लग्न झाल्यानंतर मुलीला काही महिन्यांची किंवा वर्षांनी तू आई कधी होणार? चान्स कधी घेणार असे प्रश्न विचारले जातात. मग ती मुलगी फेमस अभिनेत्री का असेना. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री देखील आई कधी होणार याची त्यांनाही उत्सुकता असते. अभिनेत्री हृता दुर्गुळेला देखील ती आई कधी होणार असे प्रश्न विचारले जातात. हृतानं अखेर या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
advertisement
advertisement
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हृता म्हणाली, "माझी आई मला नेहमी म्हणते, तुला कळेल मुलगी झाल्यावर. मुलही नाही मुलगी झाल्यावर कळेल. आता माझं लग्न होऊन चार वर्ष होतील. माझी फ्लाइट असेल आणि मी मालाडवरून जरी जात असले तरी ती चेंबूरला जागी असते. ते फक्त आईच करू शकते. कितीही रात्र होऊदेत मी सासरीच जाणार आहे मालाडला पण ती रात्री चेंबूरला जाही असते."
advertisement
advertisement
advertisement
advertisement









