वाह रे वाह! पुढचे 10 दिवस या 3 राशींच्या लोकांनी फक्त पैसे मोजायचे, मोठा धनलाभ होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ग्रह-नक्षत्रांच्या हालचाली मानवी आयुष्यावर मोठा प्रभाव टाकतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते. विशेषतः बुध, शनीसारखे ग्रह जेव्हा नक्षत्र परिवर्तन करतात, तेव्हा आयुष्यात अचानक बदल अनुभवायला येतात.
ग्रह-नक्षत्रांच्या हालचाली मानवी आयुष्यावर मोठा प्रभाव टाकतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते. विशेषतः बुध, शनीसारखे ग्रह जेव्हा नक्षत्र परिवर्तन करतात, तेव्हा आयुष्यात अचानक बदल अनुभवायला येतात. आज 10 डिसेंबर हा दिवस अशाच एका महत्त्वाच्या ग्रहघटनेमुळे खास ठरत आहे. कारण आज पहाटे बुध ग्रहाने शनीच्या नक्षत्रात प्रवेश केला असून, हा योग काही राशींसाठी दिलासादायक ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक तणाव, करिअरमधील अडथळे किंवा वैयक्तिक आयुष्यातील अडचणींना सामोरे जाणाऱ्या लोकांसाठी आता चांगले दिवस सुरू होणार असल्याचे संकेत ज्योतिषी देत आहेत.
advertisement
ज्योतिष पंचांगानुसार, 10 डिसेंबर रोजी पहाटे 2 वाजून 39 मिनिटांनी बुध ग्रह अनुराधा नक्षत्रात प्रवेश केला आहे. अनुराधा नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे. बुधाचे हे भ्रमण 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजून 13 मिनिटांपर्यंत राहणार आहे. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, संवादकौशल्य, व्यापार, नोकरी आणि आर्थिक व्यवहारांचा कारक मानला जातो. तर शनी हा संयम, शिस्त, कष्ट आणि स्थैर्याचे प्रतिनिधित्व करतो. या दोन ग्रहांच्या प्रभावामुळे निर्माण होणारा हा काळ काही राशींना विशेष लाभ देणारा ठरेल.
advertisement
वृश्चिक राशी - वृश्चिक राशीसाठी बुधाचे शनीच्या नक्षत्रातील संक्रमण आत्मविश्वास वाढवणारे ठरेल. करिअरमध्ये स्थैर्य येईल आणि रखडलेल्या योजना वेग घेतील. नोकरी करणाऱ्यांना कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते, तर व्यवसायिकांना नव्या करारांची संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल आणि जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या सहजपणे पार पाडता येतील. एकूणच हा काळ प्रगतीचा ठरेल.
advertisement
मकर राशी - मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. बुधाच्या प्रभावामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होऊ शकतात. नोकरीत पदोन्नती किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सर्जनशीलता वाढेल आणि जे काम हातात घ्याल त्यात यश मिळेल. समाजात तुमची ओळख अधिक मजबूत होईल.
advertisement
advertisement










