Mumbai Metro 8 : अखेर ठरलंच! मेट्रो 8 च्या स्थानकांची नावं आली समोर
Last Updated:
Metro 8 Station List : मेट्रो 8 मार्गिकेने मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ प्रवास फक्त 45मिनिटांत होईल. 20 स्थानकांसह ही मार्गिका नवी मुंबईतील 11 स्थानकांवर थांबेल, प्रवास वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक बनवेल.
मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना जोडणारी मेट्रो 8 ही मार्गिका तयार होत आहे. या मेट्रो मार्गिकेमुळे प्रवाशांना मोठा सोयीस्कर आणि वेगवान प्रवास मिळणार आहे. तसेच या मार्गिकेवरील एकूण स्थानकांची संख्या शिवाय त्यापैकी किती स्थानक मुंबईत आणि किती नवी मुंबईत असतील याची सविस्तर माहिती देखील समोर आली आहे.
मेट्रो 8 ही छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणा आहे. मेट्रो 8 सोनेरी मार्गिका असून तिची एकूण लांबी 34.89 किमी आहे. या मार्गिकेवर एकूण 20 स्थानके आहेत, ज्यापैकी 14 स्थानके उन्नत असून 6 स्थानके भूमिगत आहेत.
जाणून घ्या सविस्तर
नवी मुंबईत ही मेट्रो 11 स्थानकांवर थांबेल. वाशी खाडी पूल ओलांडल्यानंतर मानखुर्दपासून मेट्रो शीव-पनवेल महामार्गासोबत समांतर मार्गाने चालेल आणि नंतर नेरूळ, सीवूड्स, उरण मार्गे नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचेल. सध्या मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास रस्तेमार्गे साधारण दीड ते दोन तास लागतो, पण मेट्रो 8 मार्गिकेने हे अंतर फक्त 40 ते 45 मिनिटांत पार करता येईल.
advertisement
भूमिगत टप्पा छेडानगर ते मुंबई विमानतळापर्यंत 9.25 किमी आहे, तर उन्नत टप्पा 25.63 किमी लांबीचा आहे. हे प्रवाशांसाठी जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची हमी देईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 10, 2025 1:32 PM IST









