Marriage Fraud: दोन लाख देऊन लग्न केलं, तीन तासांत नवरी ‘भुर्र’, पाहा बीडमध्ये काय घडलं?

Last Updated:

Marriage Fraud: बीडमध्ये बनावट लग्नाच्या टोळ्यांकडून काहींची लूट झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

Marriage Fraud: दोन लाख देऊन लग्न केलं, तीन तासांत नवरी ‘भुर्र’, पाहा बीडमध्ये काय घडलं?
Marriage Fraud: दोन लाख देऊन लग्न केलं, तीन तासांत नवरी ‘भुर्र’, पाहा बीडमध्ये काय घडलं?
बीड: सध्याच्या काळात लग्नासाठी मुली ही गंभीर सामाजिक समस्या बनत आहे. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत. बीडमधील केज तालुक्यात बनावट विवाहाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोद्री येथील नागेश देवीदास जगताप यांच्याकडून तब्बल 1 लाख 90 हजार रुपये घेऊन एका एजंटने लग्न लावून दिले; मात्र नवरीने सासरी येताच केवळ तीन तासांत पळ काढण्याचा प्रयत्न केला. वेळेवर ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तिचा हा प्रयत्न फसला आणि संपूर्ण प्रकरण बाहेर आल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
नेमकी घटना काय?
6 डिसेंबर रोजी दीपेवडगाव येथील हनुमान मंदिरात एक विवाह झाला. मध्यस्थी सतीश प्रल्हाद गुळभिले याने नागेश जगताप यांना प्रीती शिवाजी राऊत हिच्यासोबत लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे मंदिरात विवाहसोहळा पार पडला आणि वधू-वरांसह नातेवाईक कोद्रीला पोहोचले. सगळं सुरळीत असल्याचं चित्र असताना दुपारनंतर अचानक नवरीच्या हालचाली संशयास्पद बनल्या.
advertisement
सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रीती राऊत हिने ‘शौचाला जाते’ असा बहाणा केला आणि घरातून हळूच पसार होऊ लागली. काही ग्रामस्थांना तिची घाईघाईची वाटचाल संशयास्पद वाटली. त्यांनी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि डिघोळअंबा बसस्थानकाजवळ तिला पकडले. चौकशीदरम्यान तिच्या उत्तरांत विसंगती दिसताच संपूर्ण घटना धुंडाळली गेली आणि हा बनावट विवाहाचा डाव असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
नागेश जगताप आणि नातेवाईकांनी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. तपासादरम्यान नवरीच्या मावशी सविता आणि माया राऊत यांचेही या फसवणुकीतील सहभागाचे धागेदोरे समोर आले. एजंट गुळभिले याने संगनमत करून कोणतेही वैधानिक कागदपत्र तपासल्याशिवाय विवाहाची व्यवस्था केल्याचे उघड झाले. बनावट नोटरी, तसेच लग्नाआधी पतीच्या नावावर बनावट आधार कार्ड तयार करण्याचाही संशय पोलिसांना आहे.
advertisement
पोलिसांनी प्रीती राऊत, तिच्या दोन नातेवाईक महिला आणि एजंट गुळभिले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रीतीला न्यायालयात हजर केले असता तिला 10 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे करत असून, बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या नोटरीधारक आणि संगणक तंत्रज्ञाचीही चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात बनावट विवाह रॅकेटबद्दल नवीन चर्चा रंगू लागल्या असून यामागची साखळी उघड करण्याची मागणी होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Marriage Fraud: दोन लाख देऊन लग्न केलं, तीन तासांत नवरी ‘भुर्र’, पाहा बीडमध्ये काय घडलं?
Next Article
advertisement
ED Raid Baramati : बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठी अपडेट
बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ
  • बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ

  • बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ

  • बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ

View All
advertisement