१४ फेब्रुवारी २०२५ ला 'छावा' चित्रपटगृहांमध्ये धडकणार आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अभिनेता विकी कौशल साकारणार असून महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत साऊथ स्टार रश्मिका मंदाना दिसणार आहे. या सिनेमाच्या टीजरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. जबरदस्त ॲक्शनने भरलेल्या या टीजरमधून चित्रपटातील थराराची एक झलक पाहायला मिळाली.
काही दिवसांपूर्वी विकी कौशलने त्याच्या फर्स्ट लूकचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकतंच रश्मिका मंदानाचा मराठमोळ्या साजशृंगारात सजलेला पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. यावेळी ती अतिशय सुंदर आणि घरंदाज दिसत आहे.
सुशांत सिंह राजपूत हा तर खरा Superhuman! दोन्ही हातांनी करायचा हे अवघड काम, 99% लोक होतात फेल
साऊथ स्टार आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाला अशाप्रकारे मराठमोळ्या पारंपारिक पेहरावात पाहून प्रेक्षकांचा उत्साह खूपच वाढला आहे. काही वेळातच या फोटोवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. आता चित्रपटातील हे ऐतिहासिक पात्र सत्यात उतरवण्यात रश्मिकाला यश येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, रश्मिका नुकतीच “पुष्पा २” मध्ये दिसली. तिच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १२२८.९० कोटींचा गल्ला जमवला आहे. अशातच तिने १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
