TRENDING:

Allu Arjun Stampede case: समन्सनंतर अल्लू अर्जुन पोहोचला पोलीस ठाण्यात, चौकशीला सुरुवात

Last Updated:

Allu Arjun Stampede case: पुष्पा 2 स्टार अल्लू अर्जुनच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. चेंगराचेंगरी पुष्पा 2 च्या प्रीमियरवेळी चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्लू वादात सापडलाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पुष्पा 2 स्टार अल्लू अर्जुनच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. चेंगराचेंगरी पुष्पा 2 च्या प्रीमियरवेळी चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्लू वादात सापडलाय. अल्लू अर्जुनला अटक झाली होती आणि त्याला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. त्यानंतर आता त्याच्या निवासस्थानी तोडफोडही झाली. या सगळ्या वादात अल्लू अर्जुनला समन्स पाठवला असून आता तो चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचला आहे.
समन्सनंतर अल्लू अर्जुन पोहोचला पोलीस ठाण्यात
समन्सनंतर अल्लू अर्जुन पोहोचला पोलीस ठाण्यात
advertisement

हैदराबाद पोलिसांनी सोमवारी अभिनेता अल्लू अर्जुनला नवीन समन्स बजावला. या प्रकरणी अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या समन्सनंतर अल्लू अर्जुन आज हैदराबाद पोलिसांसमोर हजर झाला. समन्स बजावल्यानंतर अल्लू अर्जुन चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी पोहोचला आहे.

Allu Arjun: घरावर तोडफोड, तरीही अल्लू अर्जुन शांत! पहिली पोस्ट शेअर करत म्हणाला...

advertisement

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी रविवारी काही आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील घराची तोडफोड केली. यामध्ये लोकांनी अल्लूच्या घरारवर टोमॅटो फेकले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झटापट केली. फुलांच्या कुंड्या आणि इतर मालमत्तेचे नुकसान झालं.

दरम्यान, तोडफोड करणाऱ्यांकडून 4 डिसेंबर रोजी एका सिनेमात चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या 35 वर्षीय महिलेच्या कुटुंबाला एक कोटींची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तोडफोड प्रकरणात पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलनात सहभागी असलेल्या सहा जणांना अटक केली.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Allu Arjun Stampede case: समन्सनंतर अल्लू अर्जुन पोहोचला पोलीस ठाण्यात, चौकशीला सुरुवात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल