Allu Arjun: घरावर तोडफोड, तरीही अल्लू अर्जुन शांत! पहिली पोस्ट शेअर करत म्हणाला...
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Allu Arjun: पुष्पा 2 सिनेमा एकीकडे कमाईत तुफान बॅटिंग करत आहे तर दुसरीकडे पुष्पा 2 स्क्रिनिंगदरम्यान घडलेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या अडचणी काही संपायचं नाव घेईना.
मुंबई : पुष्पा 2 सिनेमा एकीकडे कमाईत तुफान बॅटिंग करत आहे तर दुसरीकडे पुष्पा 2 स्क्रिनिंगदरम्यान घडलेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या अडचणी काही संपायचं नाव घेईना. पुष्पा 2 च्या प्रीमियर दरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अल्लू वादात सापडलाय. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली आणि त्याला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. त्यानंतर आता त्याच्या निवासस्थानी तोडफोडही झाली.
संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी रविवारी काही आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील घराची तोडफोड केली. यामध्ये लोकांनी अल्लूच्या घरारवर टोमॅटो फेकले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झटापट केली. फुलांच्या कुंड्या आणि इतर मालमत्तेचे नुकसान झालं. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने त्याची पहिली सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
घरातील तोडफोडीनंतर अल्लू अर्जुनने पहिली पोस्ट केली. अल्लू अर्जुनने या घटनांबद्दल भाष्य केलं नसले तरी यशराज फिल्म्सबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सोमवारी रात्री X वर त्याने पोस्ट केली. बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडल्यानंतर प्रॉडक्शन हाऊसने पुष्पा 2 चे कौतुक केलं होतं. YRF ने पोस्टमध्ये लिहिले होते की, “रेकॉर्ड्स हे मोडण्यासाठी असतात आणि नवीन रेकॉर्ड प्रत्येकाला चांगल्याकडे ढकलतात. इतिहासाच्या पुस्तकांचे पुनर्लेखन केल्याबद्दल संपूर्ण पुष्पा 2 द रुल टीमचे अभिनंदन. फायर नाही, वाइल्ड फायर!!!!"
advertisement
अल्लू अर्जुनने प्रॉडक्शन हाऊसला शुभेच्छा देत पोस्टला उत्तर दिले. अल्लू अर्जुनने लिहिले, “धन्यवाद… खूप छान. तुमच्या शुभेच्छांसाठी मी नम्र झालो आहे. धन्यवाद, मी भारावून गेलो आहे. आशा आहे की हा विक्रम लवकरच एका हृदयस्पर्शी YRF चित्रपटाद्वारे मोडेल आणि आपण सर्व एकत्रितपणे उत्कृष्टतेकडे वाटचाल करू.” अल्लू अर्जुनने त्याच्या घराबाहेर घडलेल्या घटनेबद्दल मात्र मौन बाळगलं.
advertisement
Thank you … so graceful . Humbled by your wishes. Thank you , I am touched . May this record soon be broken by a heart-melting #YRF film , and may we all collectively move towards excellence.
— Allu Arjun (@alluarjun) December 23, 2024
advertisement
दरम्यान, अल्लू अर्जुनला आता निवासस्थानी झालेल्या तोडफोड प्रकरणात समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनची लवकरच चौकशी होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 24, 2024 11:12 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Allu Arjun: घरावर तोडफोड, तरीही अल्लू अर्जुन शांत! पहिली पोस्ट शेअर करत म्हणाला...