Pushpa 2 Stampede : घर फोडलं, धमक्या दिल्या, रविवारी राडा, सोमवारी अल्लू अर्जुनला पुन्हा समन्स

Last Updated:

Pushpa 2 Stampede : हैदराबाद पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला अटक केली होती आणि नंतर त्याला हायकोर्टातून अंतरिम जामीन मिळाला.

 अभिनेता अल्लू अर्जुन
अभिनेता अल्लू अर्जुन
मुंबई : 'पुष्पाभाऊ'च्या मागे लागलेला समन्सचा फेरा काही सुटायचं नाव घेत नाहीये. अभिनेता अल्लू अर्जुनला आणखी एक समन्स बजावण्यात आला आहे. अल्लू अर्जुनचा त्रास वाढत चालला आहे. 4 डिसेंबर रोजी 'पुष्पा 2' रिलीज होत असताना एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी आता हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला चौकशीसाठी समन्स बजावला आहे. अभिनेत्याला आज म्हणजेच 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहायचे आहे.
या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला अटक केली आणि नंतर त्याला हायकोर्टातून अंतरिम जामीन मिळाला. अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर करण्यासोबतच न्यायालयाने त्याला या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड

रविवारी आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड केली. हे आंदोलक संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या महिलेला न्याय देण्याची मागणी करत होते. उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीचे (OU-JAC) सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निदर्शकांनी अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक केली.
advertisement

मुलांना घरापासून दूर ठेवले

या घटनेनंतर सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपल्या मुलांना सुरक्षितस्थळी नेले. यासोबतच अभिनेत्याचे वडील अल्लू अरविंद यांनी कायद्यावर विश्वास व्यक्त करत कायदा मार्गी लागेल याची खात्री असल्याचे सांगितले. यावेळी त्याला व त्याच्या संपूर्ण कुटुंबाने संयमाने वागावे असे वाटते.
अल्लू अर्जुनने चाहत्यांना खास आवाहन केले सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून अल्लू अर्जुनने त्याच्या चाहत्यांना कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका असे आवाहन केले. त्याने त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वर्तन टाळण्यास सांगितले.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pushpa 2 Stampede : घर फोडलं, धमक्या दिल्या, रविवारी राडा, सोमवारी अल्लू अर्जुनला पुन्हा समन्स
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement